परवेज जखूरा
शहर प्रतिनिधि महागांव
महागांव: महागांव शहरालगत असलेल्या एल के इंग्लिश प्रायमरी विद्यामंदिर येथे वार्षिक स्नेह सम्मेलनचे नावांने प्रति विद्यार्थी २०० रुपए शुल्क प्रमाणे दोन दिवसात पैसे जमा करण्याच्या सर्व पालकांना सुचना दील्या आहेत. त्यामुळे पालकांनि तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.तसेच पुर्ण स्नेह सम्मेलनाचा खर्च जवळपास पंचविस ते तीस हजार रूपए एवढा येणार परंतु शाळा मॅनेजमेंट ने प्रति विद्यार्थी २०० रुपए एव्हढे शुल्क आकारुन एकुन सर्व विद्यार्थ्यांची मिळुन ८० ते ९० हजार रुपए एव्हढा पालकांकडुण वसुल करण्याचा नविन फंडा सुरु केला आहे.त्यामुळे पालकांकडुण शाळा मॅनेजमेंट विरुद्ध नाराजी व्यक्त केली जात आहे.संबधित शाळेने आकारलेले हे शुल्क कशासाठी आहे असा प्रश्न पालकांना पडला आहे.त्यामुळे संबंधित शिक्षण संस्थेवर गट शिक्षणाधिकारी यांनी योग्य कार्यवाही करावी अशी मागणी पालकांकडुण होत आहे.या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणा-या सर्व विद्यार्थ्यांना गणवेशही संस्थेने ठरवीलेल्याच कापड दुकानातुन घ्यावा लागतो.तसेच शालेय पुस्तके ही शाळेतुनच विकत घ्यावी लागतात त्यामुळे कापड दुकानातही पालकांना जास्तिचे पैसे मोजावे लागतात.परंतु आपल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होवु नये यासाठी कोणिही शिक्षण संस्थेविरुध्द आवाज उठविला नाही.याच संधीचा फायदा घेत शिक्षण संस्थेने स्नेह सम्मेलनासाठी प्रति विद्यार्थी २०० रुपए शुल्क लागेल अशी सुचना पालकांना व्हाट्सएप गृपद्वारे दिली त्यामुळे पालकवर्गात शिक्षण संस्थे विरुद्ध नाराजी व्यक्त होत आहे.


