मनोज बिरादार
ग्रामीण प्रतिनिधी नांदेड
मुखेड – चिमुकले विद्यार्थी हे या देशाचे उद्याचे भावी नागरिक आहेत. जिजाऊ ज्ञानमंदिर ही शाळा व या शाळेचे संचालक ज्ञानोबा जोगदंड सर आपल्या जिजाऊ परिवाराच्या माध्यमातून तज्ञ व अनुभवी शिक्षकांच्या प्रामाणिक प्रयत्नातून विद्यार्थ्यांना क्वालिटी शिक्षण देतात. मुलांनो ! चांगला अभ्यास करा. गुरुजनांचा आदर करा. चांगले शिक्षण घेऊन आपल्या क्षेत्रात चांगला नावलौकिक मिळवा. डॉक्टर , इंजिनिअर , अधिकारी , आमदार, खासदार, होण्याआधी चांगला माणूस बना ! असे प्रतिपादन एम.डी. रेडिओलाजिस्ट डॉ. श्रीहरी बुडगेमवार यांनी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित बक्षिस वितरण कार्यक्रमात केले. दि. २१ ते २५ जानेवारी दरम्यान जिजाऊ क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन शाळेत करण्यात आले होते. या विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धक विद्यार्थ्यांना व संघाला २६ ते २७ जानेवारी रोजी प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत योग्य बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.सलग चार दिवस आयोजित केलेल्या विविध स्पर्धांची व स्पर्धक विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने सदरील बक्षिस वितरण दोन दिवसांच्या कार्यक्रमात घ्यावे लागले. विविध क्रिडास्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धानंतर बक्षिस वितरण कार्यक्रमात देशभक्तीपर गीते, नृत्यस्पर्धा , बालनाटिका , लावण्या , लोकगीते ‘फॅशन शो ‘ देशभक्त व घोषवाक्य वाचन ‘ आदी विविध गुणदर्शन कार्यक्रम दोन दिवस घ्यावा लागला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक ज्ञानोबा जोगदंड सर तर प्रमुख उपस्थितीत मुख्याध्यापक जगदीप जोगदंड सर तसेच अतिथी म्हणून पंचायत समिती मुखेडचे शिक्षण विस्तार अधिकारी बाळासाहेब कदम सर , केंद्रप्रमुख शेळके सर , ज्येष्ठ सेवानिवृत शिक्षक साधू मुळके सर , सुप्रसिद्ध युवा सराफा व्यापारी पवन पोतदार , ज्येष्ठ पत्रकार शिवाजी कोनापूरे सर तर दुसऱ्या सत्रात एम.डी. रेडिओलॉजिस्ट डॉ. श्रीहरी बुडगेमवार , पत्रकार शिवकुमार बिरादार , प्रा. मिलींद गायकवाड सर , तर तिसऱ्या सत्रात राजे छत्रपती अकॅडमीचे संचालक ज्ञानेश्वर डुमणे पाटील , कृषी अधिकारी दिगांबर शेटवाड सर, पालक प्रतिनिधी म्हणून मैनोदीन शेख , चंद्रकांत गोंदलवाड सर , सौ. जायमहेत्रे ताई , देवराज पाटील मसलगेकर सर , चंद्रकांत जाधव सर भानुदास पाटील इंगोले , बालाजी इंगोले , विलासराव जुन्ने पाटील ,दिगांबर पा. इंगोले आदी मान्यवरांची उपस्थिती होती. आपापल्या वर्गशिक्षिक व शिक्षिका यांच्या मार्गदर्शनाखाली नर्सरी ते पहिली पर्यंतच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी फॅशन शो अर्थात फॅन्सी ड्रेस स्पर्धे मध्ये सहभाग नोंदवला होता. युकेजी च्या प्रियांशी , मिताली , शुभ्रा , शरयू . , आहाना शेख , मानसी भद्रे , प्रज्वल , श्रीपाद इंगोले , आर्यन चौधरी , कुणाल शेखावत आदी चिमुकले विद्यार्थी समुहनृत्यात सहभागी झाले होते. अधिराज मस्कले नांगरधारी शेतकरी , अभिनंदन गंगावणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर बनला होता. अशीच अनेक मुले विविध नेताजींच्या वेशभूषेत सहभागी झाली होती. इयता पहिली च्या कनिष्का , राजनंदिनी, आदिनाथ या विद्यार्थ्यांनी समूहनृत्य तर गणेश, आयुश , संगीता या विद्यार्थ्यांनी गीत आणि साईनाथने अभिनय सादर केला. ‘कर चले हम फिदा ‘ … या देशभक्तीपर गाण्यावर इयता दुसरीच्या रुद्र पेड या मुलांने भावस्पर्शी नृत्य सादरीकरण करून रडायला भाग पाडले. समर्थ बंडे, समृद्धी, आणि संचानी सुंदर अशी नाटिका सादर केली. गोविंदराज गोपनर आणि संच यांनी नृत्य सादरीकरण केले. इयता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी ‘संदेशे आते है ‘ या गाण्यावर चैताली गोंदलवाड , पूनम चव्हाण , सुविज्ञा मुखेडकर , श्रेया श्रीमंगले ‘ श्रेया भालेराव , मोहिनी आगलावे आदी मुलींनी सुंदर नृत्य सादर केले. जिस देश मे गंगा रहता है या गाण्यावर अनाया चौधरी , आलिशा शेख , संस्कृती माकणे , आर्या श्रीरामे , फीर भी दिल है हिंदुस्थानी या गीतावर विहान चव्हाण, शुभम चव्हाण , कृष्णकांत जुन्ने, चैतन्य शिंदे , संगेवार विराज , मयुर गोंड , शौर्य गुट्टे , रितेश जमदाडे ‘ द्रोण गव्हाणे, विराट माकणे आदी विद्यार्थ्यांनी चांगल्याच टाळ्या मिळविल्या. सौ सुरेखा राठोड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘social Media ‘ हे मोबाईलचे दुष्परिणाम दर्शविणारे , विद्यार्थ्यांच्या व मानवी मन , मेंदूवर आक्रमण करणारे घटक याचे भयानक वास्तव या नाटिकेतून सादर केले. त्यात सुमित राठोड, आरुष धनवाडे, संभाजी भोसले, गणेश आचेवाड, आकाश चव्हाण , समर्थ चिंतलवाड , स्वरा तमशेट्टे , संचिता आडे , दिव्या मुळके, गोविंदराज कदम आदी विद्यार्थ्यांनी छान पात्रे वटवून टाळ्या मिळविल्या. चौथीच्या ईश्वरी काळे या मुलीने सुंदर नृत्य सादरीकरण करून जोरदार टाळ्या मिळविल्या. आरोही व दिविजा या मुलींनी समुह नृत्य सादर केले. तिसरीच्या दिव्या मुळके ‘ समर्थ मस्कले , सय्यद तहेमीन , पंकजा कराळे या विद्यार्थ्यांनी व्यसनाधिन तरुणाच्या संसाराचे खुप छान नाट्यमय अभिनय सादर केले. पाचवीच्या जान्हवी शिंदे व संचाने समूहनृत्य सादर केले. प्रांजल , रोहिणी या मुलींनी नृत्य सादर केले.रेवा गायकवाड या मुलीने ‘बरसो रे मेघा बरसो ‘ या तर उज्ज्वल गायकवाड या मुलाने पुष्पा २ मधल्या गाण्यावर चांगलीच शाबासकी मिळवली. जान्हवी शिंदे या मुलीने संदेशे आते है या गाण्यावर नृत्य करून टाळ्या मिळवल्या . वेदश्री जुन्ने , रिहान शेख यांनी गीत गायले . जाधव मॅडम व गीते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली नर्सरी क्लासच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. अधून मधून नृत्य, नाटिका , गीत गायन आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण अशा मिश्र स्वरूपाच्या कार्यक्रमामुळे चांगलीच रंगत वाढली. विविध स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांनी बक्षिसांची अक्षरशः लयलूट केली. विविध स्पर्धेच्या माध्यमातून मिळालेल्या संधीचे विद्यार्थ्यांनी सोने केले. वंदेमातरम् गीत गाऊन कार्यक्रमाचा समारोप झाला. मुख्याध्यापक जगदीप जोगदंड यांच्या नेतृत्वात सुधाकर जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमाचा आरंभ संगीतशिक्षक सचिन सुर्यवंशी सर व विनिता चव्हाण यांच्या स्वागतगीताने झाला. कार्यक्रमाचे बहारदार असे सुत्रसंचलन परविन शेख मॅडम , सायराबानु शेख मॅडम यांनी केले. प्रास्ताविक निरोजा जगताप मॅडम यांनी केले.यावेळी विद्यार्थी पालक बहुसंख्येनी उपस्थित होते.

