शेख शमशोद्दिन
तालुका प्रतिनिधी मुदखेड
मुदखेड – नुकतेच मुदखेड मध्ये चौथे राज्यस्तरीय साहित्य संमेलन पार पडले उदघाटन समारंभात मा.खा. अशोक चव्हाणांना आठवली कविता केस माझे हे जेंव्हा गळु लागले तेंव्हा लोक हे मला कळु लागले प्रज्ञा दर्शन शिक्षण संस्था मुदखेड व सप्तरंगी साहित्य मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने रणछोड मंगल कार्यालयात आयोजित साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संमेलनाचे उदघाटक म्हणून खा.अशोक चव्हाण तर संमेलनध्यक्ष म्हणून सू प्रसिद्ध साहित्यिक डॉ. जगदीश कदम स्वागतध्यक्ष प्रवीण गायकवाड, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेटी, तहसीलदार आनंद देऊळगावकर, गोविंदराव नागेलिकर आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना खा. चव्हाण म्हणाले की, समाजातील वास्तवाला वाचा फोडणे ही साहित्तीकांची जबाबदारी आहे.सद्या देशात खोट्या अफवा खूप नेटाने पसरविल्या जात आहेत. विशेषता: राज्यघटने बाबत खूपसंभ्रम पसरवीला जात आहे. जे सत्य आहे ते मंडण्याची हिम्मत विरोधकांनी दाखवावी खोट्या गोष्टीचा बाऊ करूनका असे आवाहन करत राज्यघटना हे त्रिकाल बाधित सत्य आहे ते कुणीच बदलू शकत नाही. याचे वास्तव अनेकदा सर्वोच्च न्यायालयाने विषद केले आहे. सरकार मधील नितीन गडकरी व माझ्यासह अनेकदा अनेकांनी मांडले आहे. हे खरे आहे की, मी माणसे ओळखान्यात कमी पडलो पण केस माझेहे जेंव्हा गळू लागले तेंव्हा माणसे मला कळू लागले. असे परखड मत उदघाटकीय भाषणात व्यक्त केले. यावेळी पांडुरंग पोकुलवार यांनी प्रास्ताविक केले तर प्रल्हाद इंगोले यांनी संमेलनाचे महत्व विषद केले, स्वागताध्यक्षीय भाषण प्रवीण गायकवाड यांनी केले तर अध्यक्षीय समारोप डॉ. जगदीश कदम यांनी केला.
या कार्यक्रमात राज्यातील विविध जिल्ह्यातील कवी, गझलकार ,कथालेखक यांनी आपापले लेखन कौशल्य सादर करून सहभाग नोंदविला.सकाळी संपूर्ण मुदखेड शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली होती,दिंडीत राजर्षी शाहू विद्यालय, युनिव्हरसल इंग्लिश मेडीयम स्कूल, महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यालया च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवीला यावेळी भजनि मंडळाच्या टाळ, ढोलकी अन ब्यांजोच्या स्वरांनी संपूर्ण शहर अगदी दुमदुमून गेले होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापकीय अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, राज्यध्यक्ष नागोराव डोंगरे,रंजित गोनारकर,पांडुरंग कोकुलवार,राहुल जोंधळे,प्रज्ञानंद ढवळे, रुपाली वाघरे,कैलास धुतराज, मारुती कदम, आदींनी विशेष परिश्रम घेतले.
तर भाजपा शहराध्यक्ष संजय सोनटक्के, शिवसेना शहर प्रमुख सचिन माने माजी नगर उपाध्यक्ष शंकर राठी, माधव कदम,माजी नगरसेवक गोविंद गोपनपल्ले, संजय आउलवार,गंगाधर डांगे, माजी संचालक सुरेश शेटे शंकर मुतकलवाड,पुरुषोत्तम चांडक,प्रभाकर पांचाळ,कानोबा बिस्मिले,सतीश मुंगल गजानन कमळे, राजू निखाते आदी मान्यवर उपस्थित होते

