पवन ठाकरे
ग्रामीण प्रतिनिधी संग्रामपूर
संग्रामपूर:श्री संत सखाराम महाराज सखारामपूर येथे दिनांक 2 फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीला यात्रा महोत्सवात दरवर्षी प्रमाणे विदर्भ खानदेशातील सुमारे 200 ते 250 दिड्यांचे आगमन होणार असून 28 जानेवारी पासून या महोत्सवाचा प्रारंभ सुरू झाला आहे. वैकुंठवासी गुरुवर्य श्रीराम महाराज मेहूणकर प्रेरितही पुण्यतिथी गेल्या अनेक वर्षांपासून अविरत अखंड नामजप सुरू आहे. या पुण्यतिथी महोत्सवात केवळ हरिनाम किर्तन भारुड ज्ञानेश्वरी पारायण आदी धार्मिक कार्यक्रम होत असल्याने लाखोंच्या संख्येने भाविक या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात. 3 फेब्रुवारी रोजी सकाळी यात्रेतील चिंचोलीच्या फडावर श्री श्रेत्र देवगड येथील भास्करगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने पुण्यतिथी महोत्सवाचा समारोप होणार आहे. या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन संस्थान च्या वतीने करण्यात आले आहे.


