अरविंद बेंडगा
तालुका प्रतिनिधी, तलासरी
तलासरी :- स्माईल फाउंडेशनच्या वतीने आणि NCR, अटलोसच्या सहकार्याने गरोदर मातांना गरोदर पनात घ्यावयाची काळजी जन जागृती कार्यक्रम तसेच गरोदर मातेचे आरोग्य शिबिर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात उप केंद्राचे डॉ. तुषार गायकवाड (समुदाय वैदकिय अधिकारी), ANM हर्षला फरडे आणि आशा कर्मचारी सहभाग घेतला,स्माईल फाउंडेशन, दिल्लीचे स्वास्थ्य वरिष्ठ व्यवस्थापक मो. अमिल यांच्या आदेशानुसार, के. एम. सोनटक्के (सामुदायिक आरोग्य अधिकारी, स्माईल फाउंडेशन) यांच्या मार्गदर्शनाखाली या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले,या कार्यक्रमात चिकित्सा अधिकारी डॉ. प्रणय पाटील यांनी गरोदर पनातील नोंदणी, गरोदर पनातील उपचार, गरोदर पनातील आहार. यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच के. एम. सोनटक्के (सामुदायिक आरोग्य अधिकारी) आणि ए.एन.एम. अनुसया गावित यांनी गरोदर मातांना स्माईल ऑन व्हील्स द्वारे दिल्या जाणाऱ्या सेवांविषयी माहिती दिली,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिलेले सदस्य,ए.एन.एम. अनुसया गावित,कम्युनिटी मोबिलायझर अश्विनी माळकरी,ड्रायव्हर सुमित सांबर, गरोदरपनातील घ्यावयाची IEC (Information, Education, and Communication) उपक्रम राबवले गेले,सत्रामध्ये समाविष्ट विषय:
- परिचय,गरोदर पनातील नोंदणी, गरोदर पनातील उपचार, गरोदर पनातील आहार. आजच्या या कार्यक्रमात डॉ. प्रणय पाटील, ए.एन.एम. अनुसया गावित आणि सी.एच.ओ. के. एम. सोनटक्के यांनी वरील सर्व विषयांवर सखोल मार्गदर्शन केले,SoW_NCR, पालघर,धन्यवाद!


