संजय शिंदे
ग्रामीण प्रतिनिधी इंदापूर
भिगवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत भिगवन पोलीस स्टेशन व रोटरी क्लब भिगवन महामार्ग सुरक्षा पोलीस पथक डाळज नं.1 ग्रामपंचायत भिगवन व भिगवन पोलीस स्टेशन हद्दीतील प्रतिष्ठित नागरिक यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह चे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमांमध्ये भैरवनाथ विद्यालय भिगवण अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल भिगवन या शाळेतील मुलांनी भाग घेऊन परिसरामध्ये रॅली काढून सुरक्षा सप्ताह हा लोकांना रस्ता सुरक्षा उपयांना प्रोत्साहन देण्यासाठी रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमाबद्दल शिक्षित करण्यासाठी प्रबोधन करण्यात आले पथनाट्यसाठी सुशिक्षक संगपाल कांबळे, रजनीकांत भोसले, रोटरी क्लब अध्यक्ष सौ. अर्चना जानकर व सौ. मोहिनी गावडे यांनी परिश्रम घेऊन मुलांना मार्गदर्शन करून पथनाट्यद्वारे वाहतूक नियमांचे कसे पालन करावे याचे सादरीकरण केले राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा सप्ताह मध्ये भाग घेतलेल्या मुलांना मा.गणेश बिराजदार अपर पोलीस अधीक्षक बारामती, विभाग पुणे ग्रामीण व मा. सुदर्शन राठोड सो उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग पुणे ग्रामीण यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा सप्ताह मध्ये मा. गणेश बिराजदार सो, अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग पुणे ग्रामीण, मा.डॉ सुदर्शन राठोड सो विभागीय पोलीस अधीक्षक बारामती विभाग, मा. विनोद महांगडे, सहा पोलीस निरीक्षक, भिगवन पोलीस स्टेशन, प्रवीण जर्दे, पोलीस उपनिरीक्षक महेश कुरेवाड, पोलीस उपनिरीक्षक विजय खाडे पोलीस उपनिरीक्षक भिगवन श्री सुर्वे साहेब उपअभियंता भिगवन ,चौधरी साहेब व सर्व पोलीस स्टाफ रोटरी क्लब भिगवन अध्यक्ष श्री. संतोष सवाणे संस्थापक अध्यक्षश्री. सचिन बोगावत, सदस्य रणजीत भोंगळे, रियाज शेख, संजय चौधरी, कुलदीप ननवरे, संजय खाडे, किरण रायसोनी संजय रायसोनी महामार्ग पोलीस स्टाफ ग्रामपंचायत भिगवन व भैरवनाथ विद्यालय भिगवण अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल भिगवन या शाळेतील मुलांनी सहभाग घेतला होता.

