नागेश निकोसे
शहर प्रतिनिधि नागपूर
विशेष ग्रामसभेत ठराव मंजूर
हिंगणा विधानसभा मतदार संघात येत असलेल्या नागपूर ग्रामिण तालुका मधल्या बोखारा ग्रामपंचायतीला नगरपंचायत दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे २६ जानेवारीला झालेल्या विशेष ग्रामसभेत बहुमताने ठराव मंजूर करण्यात आला बोखारा ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा मिळू नये याकरिता सुरुवाती पासून कांग्रेसचे काही कार्यकर्ता प्रयत्नशील होते हात वर करून ठराव मंजूर करण्यात आला यावेळी विरोधात फक्त कांग्रेसच्या कार्यकर्त्यांची चार मते पडली.
गावातील प्रत्येक माणूस ग्रामसभेचा सभासद आहे ग्रामसभा सर्वांच्च आहे ग्रामसभेकडे सर्व अधिकार आहे मात्र अजूनही सर्वसामान्य नागरिकांना ग्रामसभेचे महत्व कळले नाही त्यामूळे सत्ताधारी मनमर्जी काम करीत असतात अनेक ग्रामपंचायतच्या ग्रामसभा तहकूब होतात मग खऱ्या अर्थाने खेला सुरू होतो.
बोखारा ग्रामपंचायत येथे भाजप मित्र पक्षाची सत्ता आहे गावाचा सर्वांगिण विकास झाला पाहिजे त्याकरिता नगरपंचायत महत्वाची आहे याची कल्पना बोखारा ग्रामपंचायत प्रभारी सरपंच व इतर ग्रामपंचायत सदस्यांना आहे त्यामूळे सत्ताधारी ग्रामपंचायत सदस्यांनी नगरपंचायत दर्जा प्रस्ताव मंजूर झाला पाहिजे या दृष्टीकोनातून नियोजन केले त्यात ते यशस्वी झाले हि त्यांच्या जमेची बाजू आहे.
नगरपंचायतचा दर्जा मिळवून घेण्यासाठी विषयपत्रिकेवर विषय घेने आवश्यक आहे २६ जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यापूर्वी विषयपत्रिकेवर बोखारा ग्रामपंचायतला नगरपंचायत बोखारा मध्ये रूपांतर करण्यास मंजुरी देने हा विषय घेण्यात आला ग्रामपंचायत मध्ये झेंडावंदनासाठी आलेल्या नागरिकांना बोखारा ग्रामपंचायत करिता नगरपंचायत दर्जा का महत्वाचा आहे हा विषय समजावून सांगण्यात आला यावेळी जवळपास ४०० नागरिकांनी मतदानात भाग घेतला ४ कांग्रेसचे कार्यकर्ते सोडले तर बहुमताने ठराव मंजूर करण्यात आला.
प्रत्येक विकासात्मक कामात ईच्छाशक्ती असावी लागते हे बोखारा ग्रामपंचायतने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

