कैलास श्रावणे
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
२७जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्र राज्याचे मृद् व जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम, उद्योग, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, पर्यटन राज्यमंत्री माननीय ना. इंद्रनिल नाईक साहेब यांचा वाढदिवस शिवसेना पुसद यांच्यावतीने शिवसेना नेते मा. राजन मुखरे यांच्या अध्यक्षतेखाली मा. एड. उमाकांतजी पापीनवार जिल्हा प्रमुख शिवसेना यांच्या मार्गदर्शनात भव्य दिव्य स्वरूपात आतिश बाजी करीत ढोल ताशाच्या गजरात यवतमाळ जिल्ह्याची थीम साकारलेला केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सदबाराव मोहटे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब उर्फ क्रांती पाटील कामारकर राष्ट्रवादी जिल्हाप्रमुख, मा. विजय जाधव, मा. निशांत बयास, मा. कौस्तुभ धुमाळ, मा. निखिल गादेवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते. शिवसेनेच्या वतीने या प्रमुख मान्यवरांचा सुद्धा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
मा. ना.इंद्रनील नाईक साहेब यांच्या वाढदिवशी शिवसेनेच्या वतीने ढोल ताशाच्या गजरात त्यांचे शिवसेना अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी शिवसेना कार्यालय पुसद येथे मोठ्या उत्साहात स्वागत आले.
मा. ना. इंद्रनील नाईक साहेब यांचे शिवसेना कार्यालय मध्ये स्वागत करीत असताना शिवसेनेच्या वतीने सन्मानपूर्वक सन्मानाचा फेटा बांधण्यात आला. महिला भगिनी यांनी औक्षण करीत त्यांना ओवाळण्यात आले. ना. इंद्रनील नाईक यांचा शिवसेनेच्या वतीने स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ, तथा मनमोहक अशा भव्य दिव्य पुष्पहारणे स्वागत करण्यात आले.
मा. ना. इंद्रनील नाईक यांच्या हस्ते प्रभू श्री रामचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच लोकनेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीचे औचित्य साधून नामदार इंद्रनील नाईक यांच्या हस्ते त्यांच्याही प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
शिवसेना यांच्या वतीने शिवसेना कार्यालय पुसद येथे मा. ना. इंद्रनील नाईक यांचे पुष्पगुच्छानी सजवलेल्या वजन काट्यावर आदर पुर्वक साखर तुला करण्यात आली. मा.ना. इंद्रनील नाईक यांच्या हस्ते शिवसेनेच्या वतीने गोरक्षणाकरिता देण्यात येणारे खाद्य गोरक्षणाचे संचालक यांच्या सुपूर्द करण्यात आले.
माननीय नामदार इंद्रनील नाईक साहेब यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेच्या वतीने यवतमाळ जिल्ह्याची थीम असलेला विशेष असा केक तयार करून त्यामध्ये वेगळा पुसद जिल्हा दर्शवित माननीय नामदार इंद्रनील नाईक साहेब यांच्याकडे पुसद जिल्हा निर्मिती होण्याचे दृष्टीने योग्य ते प्रयत्न करण्याचे साकडे घातले.
एडवोकेट उमाकांत पापीनवार शिवसेना यवतमाळ जिल्हा प्रमुख यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सुद्धा पुसद जिल्हा होण्याच्या दृष्टीने माननीय नामदार इंद्रनिल नाईक योग्य ते सहकार्य करतील असा आशावाद व्यक्त केला. माननीय नामदार इंद्रनिल नाईक यांनी आपल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी कोणताही भेदभाव न करिता मोठ्या मनाने तथा इमानदारीने सहकार्य केले. म्हणूनच मी एक लाख मताच्या जवळपास एवढ्या भरघोस मतांनी निवडून आलो. आणि त्यामुळेच राज्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो असे गौरवोद्गार शिवसेना कार्यकर्त्यांकरिता व्यक्त करीत भविष्यात शिवसेना कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून साथ देण्याचे आश्वासित केले. माननीय नामदार इंद्रनील नाईक साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला शिवसेना अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सुचिता तुंडलवार यांनी केले, दीपक काळे उपजिल्हाप्रमुख यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवसेना पुसद तालुका, पुसद शहर चे कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

