कैलास श्रावणे
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
माँ जगदंबा माता संस्थान येरावार ले-आऊट ईटावा वॉर्ड पुसद येथे दिनांक २३/०१/२०२५ रोजी सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेचे अध्यक्ष. हाजूसिंग चव्हाण नायक .व मेश्राम कडेल कारभारी होते. या सभेमध्ये संत सेवालाल महाराज जयंती, मंदिराची नियमित साफसफाई करणे,विद्या इन्स्टिट्यूटपुसद येथील संचालक. ज्ञानेश्वर अजमिरे यांच्या मार्गदर्शनामुळे ५४ विद्यार्थी सरकारी सेवेत लागल्यामुळे ज्ञानेश्वर अजमिरे यांचा सत्कार आयोजित करणे,जनता शिक्षण प्रसारक मंडळ येतील गोकुळ ठाकूरसिंग राठोड प्रयोगशाळा सहाय्यक हे वयोमानानुसार सेवानिवृत्ती होत आहे, तसेच बाबूलाल जाधव सेवानिवृत्त वनपाल हे सुद्धा वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा सत्कार करणे, जगदंबा माता संस्थान दरमहिना वर्गणीदार नवनियुक्त सभासदांचे स्वागत करणे, व वेळेवरील विषय या संदर्भात सभा आयोजित करण्यात आली होती.या या सभेमध्ये विजय मेरसिंग राठोड, रामधन राठोड, प्रकाश चव्हाण, राम जाधव, देशमुख प्रकाश पवार,रमेश दलसिंग राठोड, आत्माराम बन्सी जाधव, ज्ञानेश्वर अजमिरे,गोकुळ राठोड, बाबुलाल राठोड,राजेश तुंनगर,कैलास मांडोळे, विनोद फुलमाळी भारत महिंद्रे,नायक हाजुसिंग चव्हाण कारभारी मेश्राम कडेल,पंडित नंदू राठोड महेश सुभाष चव्हाण यांचे मोलाचे परिश्रम लाभले.

