रवि राठोड
ग्रामीण प्रतिनिधी वाकान
महागांव ः तालुक्यातील वाकान येथील जिल्हा परिषद मराठी शाळा ग्रां पंचायत कार्यालय बाल अंगणवाडीच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिन अती उत्साह पुर्वक साजरा करण्यात आला सर्व प्रथम भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर परम पूज्य महात्मा गांधी बंजारा भुषण वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पुजन करन्यात आले यावेळी सरपंच,तलाठी, पोलिस पाटील,शालेय समिती अध्यक्ष उप अध्यक्ष आणि ग्रां पंचायत उपसरपंच ग्रां पं सदस्य यांच्या शुभहस्ते शासकीय प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले या प्रजासत्ताकदिन सोहळ्याच्या कार्यक्रमात गावातील प्रतिष्ठित नागरिक शामराव भगत,माजी उपसरपंच बाळु चव्हाण, मुख्याध्यापक लांडगे सर, वर्ग शिक्षक खटारे सर, साहेबराव राठोड सर, बोबडे सर,व आदी शिक्षक रूंदासह तंटामुक्ती अध्यक्ष, रोजगार सेवक, ग्रां पं आॅपरेटर, ग्रां पं कर्मचारी,अंगनवाडी सेविका, आशा वर्कर, कंट्रोल डीलर माजी सरपंच तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ध्वजारोहणानंतर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी विविध कला प्रदर्शन सादर करून उपस्थितांचे मन जिंकले या कार्यक्रमाला ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहुन विध्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले या प्रजासत्ताक दिनी ग्रामस्थ विध्यार्थ्यी मुला मुलींचा मोठा सहभाग होता गावातील लोकांच्या सहकार्यातून देशभक्तीवर गीत आणी कला प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अशा प्रकारे २६ जानेवारी २०२५ चा ७६ वा प्रजासत्ताक दिन आनंदमय आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमानी गावकऱ्यांमध्ये एकोपा आणि देशप्रेमाची भावना निर्माण केली

