प्रविण शिंदे
ग्रामीण प्रतिनिधी आंबेगाव
मंचर ता. आंबेगाव तालुक्यातील मोठ्या प्रमानावर अवेध्य गौन खनीज उतखनन आणि अवेध्य वाहतूक सुरु असून या कडे महसूलच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.प्रत्येशांत रीतसर परवानगी घेऊन आणि रॉयलटी वाळू,दगड, माती, मुरूम आदी गौन खनिजे बे कायदेशीर सुरु असून काही ठिकाणी परवानगी नसताना देखील अवेध्य बे कायदेशीर वाहतूक सुरु आहे.गौन खनिजे वाहतूक आणि विक्रीला आळा घालण्यासाठी तहसीलदार हा प्रशासनातील महत्वाचा घटक आहे.गौन खनीज आणि बे कायदेशीर वाहतूक थांबवण्या साठी अवेध्य उतखन सुरु असणारी ठिकाने. खानपट्टे,प्रमुख बांधकाम स्थळें या ठिकाणी वारनवर भेटी आणि छापे टाकणे तसेच वाहणाना सुस्तीतील जपीएस असल्याची खात्री करणे अपेक्षित असते. मात्र आंबेगाव तालुक्यात बे कायदेशीर उखन वाहतूक विक्रीवर कारवाई करताना दिसत नाहीत.या अवेध्य वाहतुकी मुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडत असून तहसीलदार साहेब या अवेध्य व बे कायदेशीर वाहतुकीवर कारवाई करणार की नाही असा सवाल पर्यावरण प्रेमी व सुजन नागरिक करत आहेत.
आंबेगाव तालुक्यातील अवसरी, अवसरी फाटा, पेठ,जारकरवाडी, लोणी,वडगाव काशिबे, निघोट वाडी आश्या अनेक ठिकाणी दगड, मुरूम, माती गौन खनिजे उतखहन आणि वाहतूक सुरु असून बऱ्याचदा गायरान आणि वन विभागाच्या हद्दीतील जमिनी आदी ठिकाणी होत असून या सर्व अधिकाऱ्याच्या सनमतानी होत आहे की काय असा संशय गावातील नागरिक वेक्त करत आहे.

