स्वरूप गिरमकर
ग्रामीण प्रतिनिधी शिरूर
शिरूर : शिरूर तालुक्यातील गोलेगाव येथे सोलर हायमास्ट दिवे बसवल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. एकीकडे ग्रामीण भागात बिबट्याची प्रचंड दहशत असून गावठाण क्षेत्रच अंधारात असल्यामुळे नागरिक रात्रीचे बाहेर येण्यास धजावत नव्हते. गोलेगाव ग्रामपंचायतने याबाबत जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल पाचर्णे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. याची दखल घेत राहुल पाचर्णे यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गोलेगावकरांचा प्रश्न तात्काळ सोडवत प्रश्न मार्गी लावला. या बद्दल ग्रामस्थ कौतुक आणि आभार मानत आहे. गोलेगावातील गावठाण तसेच कानिफनाथ देवस्थान येथे रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश असावा या उद्देशाने गोलेगावच्या सरपंच दीपाली तुषार पडवळ,उपसरपंच निलेश बांदल यांनी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल पाचर्णे यांच्याकडे पाठपुरावा करत या ठिकाणी दोन सोलर हायमास्ट दिवे बसाविण्यात आले.अजूनही गावातील बऱ्याच सोयी सुविधांविषयी राहुल पाचर्णे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा सुरु असून येणाऱ्या काळात बरेच प्रश्न मार्गी लागणार आहेत अशी माहिती गोलेगावचे उपसरपंच निलेश बांदल यांनी दिली.


