राजू बडेरे
ग्रामीण प्रतिनिधी जळगाव जा.
जळगाव जामोद : स्थानिक संत गजानन महाराज बहुउद्देशीय संस्था पारस तालुका बाळापुर जिल्हा बुलढाणा च्या वतीने श्री गजानन महाराज वाटीका परिसरात विधवा महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न झाला विधवा महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न करण्यासाठी संस्था अध्यक्ष सौ.दुर्गाबाई दादगळ यांनी परिश्रम घेतले. विधवा महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम हा एक सामाजिक कार्यक्रम आहे ज्यामध्ये विधवा महिलांना हळदी आणि कुंकू लावून त्यांचा सन्मान केला जातो. या कार्यक्रमाचे उद्देश्य विधवा महिलांना समाजात सन्मान देणे आहे. हा कार्यक्रम विधवा महिलांना त्यांच्या जीवनात नवीन उमंग आणि उत्साह देण्यास मदत करतो. कार्यक्रम यशस्वीते साठी संस्थेच्या अध्यक्ष सौ.चंदाताई ददगाळ, शारदा वर्मा, सुनंदा गवई, मंगला भारसाकडे, माधुरी कुळकर्णी, शारदा वाकडे, मंदा बाळू सातव, ज्योती गजानन मुरहेकर, लता तुळशीराम लुळेकर, लक्ष्मी प्रशांत मिसाळ, सुमन मारोती घुगे आदी सदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळी असंख्य महिलांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे परिसरात कौतुक करण्यात येत आहे.

