दिपक केसराळीकर
तालुका प्रतिनिधी बिलोली
बिलोली तालुक्यातील चिटमोगरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन व भारतीय संविधानाचा 75 वा अमृत महोत्सव विविध कार्यक्रमांनी रविवारी साजरा करण्यात आला.प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक अशोक बावणे यांच्या हस्ते महात्मा गांधी व संविधान निर्माते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीता नंतर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव वर्ष व संविधान निर्मितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान याविषयी शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख ज्येष्ठ पदवीधर शिक्षक अनिल गायकांबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कु.निकिता भेदेकर ,श्वेता शिरगिरे, श्रीनिवास बोडके,संघर्ष भेदेकर,कोमल कोकणे, आनंद शिरगिरे, संस्कृती कोकणे आदी शाळेतील विद्यार्थिनीं सुद्धा आपली मनोगते व्यक्त केली. माता – पालक गटातील महिलांचा ही यावेळी सत्कार करण्यात आला. शाळेमार्फत घेण्यात आलेल्या खो खो,कबड्डी, प्रश्नमंजुषा,लंगडी आदी वेगवेगळ्या स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी सरपंच आकाश कोकणे, उपसरपंच शिवराज शेळके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश्वर मेहत्री, श्याम मजगे ,भास्कर भेदेकर, मच्छिंद्र काळेकर शाळेतील सहशिक्षक महेश पाटील,जोशी मॅडम, स्वामी मॅडम, दुड्डे आधी उपस्थित होते.

