व्येकटेश चालुरकर
तालुका प्रतिनिधी अहेरी
अहेरी. तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले गुण-कला सादर करण्याचे शाळेतील एकमेव स्थान म्हणजे रंगमंच होय. आज च्या घडीला कलाक्षेत्रात नावलौकिक झालेले कलावंत रंगमंचावरून आले आहेत म्हणून प्रत्येक शाळेत रंगमंच अत्यावश्यक आहे असे प्रतिपादन शाळा समितीचे अध्यक्ष अरविंद परकीवार यांनी केले आहेत.जिल्हा परिषद उच्च केंद्र शाळा राजाराम येथे रंगमंच उदघाटन प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून समितीचे अध्यक्ष अरविंद परकीवार तर उदघाटक सरपंच मंगला आत्राम, सहउदघाटक उपसरपंच रोश कंबगौनीवार,प्रमुख अतिथी डॉ राजेश मानकर,माजी सभापती भास्कर तलांडे,ऍड. रुपाली गेडाम, जितेंद्र पंजलवार, जितेंद्र गड्डमवार,पेसा अध्यक्ष विनोद सिडाम,तृप्ती सिडाम विनायक आलाम, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना अध्यक्ष अरविंद परकीवार आमचा गाव, आमची शाळा विकसित करण्यास शाळा समिती पुढाकार घेऊन शाळेतील भौतिक सुविधा पूर्ण करण्यास ग्राम पंचायत किँवा अन्य ठिकाणी हुन निधी आणून शाळेचे विकास करण्यास समिती व ग्राम पंचायत अधिकारी सहकार्य करावे असे म्हटले या वेळी अनेक मान्यवर आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन चुधरी तर प्रास्तविक शिक्षण विस्तार अधिकारी सुनिल आईचंवार आभार प्रदर्शन अजय पस्पुनूरवार यांनी मानले.
याप्रसंगी शाळेतील शिक्षकवृंद व कर्मचारी शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

