सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी केले ७६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
सिध्दार्थ कांबळे
ग्रामीण प्रतिनिधी बिलोली
कुंडलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत कुंडलवाडी ते पिंपळगाव (कुं.) जाणाऱ्या रस्त्यावर अवैध देशी दारू वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावर कुंडलवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे व इतर सहकाऱ्यांनी ६ हजार ७२० रुपयांची देशी दारू व ७० हजार रुपये किमतीची मोटरसायकल असा ७६ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून कुंडलवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई २८ जानेवारी रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास करण्यात आली आहे. कुंडलवाडी ते पिंपळगाव जाणाऱ्या रस्त्यावर दि.२८ जानेवारी रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास अवैध दारू वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती कुंडलवाडी पोलिसांना मिळाली.यावरून कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे,पोहेकाँ शंकर चव्हाण, पोहेकाँ अरुणा श्रीवास्तव व रवि देशमुख यांनी पिंपळगाव रस्त्यावर मोटरसायकल क्र.एम एच २६ सी एस ०३९८ या क्रमांकाच्या मोटरसायकल वरून अवैध दारू वाहतूक करीत असताना राजशेखर गोपाल गौड निम्माला यास पकडले.असून त्याच्याकडून ६ हजार ७२०, रुपये किमतीची देशी दारू भिंगरी संत्राचे ९६ बॉटल व ७०-हजार रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण ७६ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी राजशेखर गोपाल गौड निम्मला याच्याविरुद्ध कुंडलवाडी पोलीस स्टेशन गुरनं ९/२०२५ कलम ६५ ई दारूबंदी कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ शंकर चव्हाण हे करीत आहेत.

