मारोती एडकेवार
सर्कल :प्रतिनिधी सगरोळी
सगरोळी : हिप्पारगा थडी येथे, 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात, जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, व ग्रामपंचायत कार्यालय,व अंगणवाडी 1 व क्रमांक 2 मध्ये,मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये पहिली,ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी.इंग्रजी शब्दाच्या माध्यमातून,प्रजासत्ताक दिनाविषयी मनोगत व्यक्त केले. निसर्गप्रेमी, शिक्षक गेंदेवार सर प्रस्तावना,व सूत्रसंचालन केले.जुहा हबीब सय्यद,या विद्यार्थिनी वृक्ष रोपण व पर्यावरण, याविषयी आपल्या मनोगतातून गावकऱ्यांना जागृत केले, गायकवाड सरांनी विद्यार्थ्यांना चांगले उपक्रम घेण्यात आले, व गावातील सरपंच इनामदार रहेबर, व माजी,सरपंच मिया पटेल, पत्रकार मारोती एडकेवार, वंचित बहुजन आघाडी आघाडीचे शाखा अध्यक्ष मुज्जू भाई सय्यद,नाईक सर, या सर्वांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त,आपले मनोगत मांडले. उपस्थित गावचे पोलीस पाटील शंकर महाराज,शालेय समिती अध्यक्ष सय्यद एजाज, उपाध्यक्ष उमर सय्यद, उपसरपंच मारोती एडकेवार, भगवान एडकेवार,माजी सरपंच साहेबराव अंजनीकर, भुरे लक्ष्मण पटेल,व सर्व आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, शिक्षणप्रेमी, गावकरी शिक्षक उपस्थित होते,आभार प्रदर्शन, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मुटेपोड सर यांनी केले.

