रितेश टीलावत
जिल्हा प्रतिनिधी अकोला
संपूर्ण तेल्हारा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणाऱ्या सेंट पॉल अकॅडमी हिवरखेड यांच्या वतीने आपले विद्यार्थी व पालकांसाठी युफोरिया द कल्चरल फेस्टिवल 2025 चे आयोजन करण्यात आलेलं होतं या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक नवनीत लखोटिया तसेच उद्घाटक म्हणून अनिल गावंडे उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य व अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्यासोबत हिवरखेड पोलीस स्टेशनचे एपीआय गजानन राठोड तसेच हिवरखेड केंद्राचे केंद्रप्रमुख श्री प्रमोद पोके सर, रमेश भाऊ दूतोंडे, संस्थेचे सचिव प्रमोद चांडक सर संस्थेचे सदस्य शारदा लखोटिया, दिपम लखोटिया व पालक प्रतिनिधी म्हणून संतोष दाभाडे, संदीप पालीवाल, संदीप इंगळे, विजय हागे, डॉक्टर मोहम्मद मुजमील जमादार हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली त्यानंतर आपल्या भारतीय संस्कृती प्रमाणे आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणे हे आपले कर्तव्य असून त्याप्रमाणे आलेल्या सर्व पाहुण्यांना शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन संस्थेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले सेंट पॉल अकॅडमी हिवरखेड ही शाळा मॉर्निंग स्टार मल्टी पर्पस एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या अंतर्गत येत असून यावर्षी या संस्थेला 25 वर्षे पूर्ण झाली. त्यानंतर स्वागत गीताने या कार्यक्रमा ची सुरुवात झाली. जवळ पास 33 प्रकारचे वेगवेगळे नृत्य प्रकार, नाटक व शाळेतील मुलांनी वेगवेगळे गीत सादर केले. तसेच प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना या संपूर्ण कार्यक्रमां मध्ये श्रद्धांजली म्हणून त्यांच्यावर एक नाटिका ही सादर करण्यात आली तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरही नाटिकेचे सादरीकरण करण्यात आला तसेच शाळेतील वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या परीक्षांमध्ये प्राप्त केलेल्या यशाबद्दल त्यांचा व त्यांच्या पालकांचा सन्मान सुद्धा या सोहळ्यामध्ये करण्यात आला. जवळपास साडेतीन ते चार हजार नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते हिवरखेड शहराचा इतिहासा मध्ये न भूतो न भविष्यती अशा स्वरूपाचा दिमाखदार युफोरिया द कल्चरल फेस्टिवल 2025 मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीते करता शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत तिवारी उपमुख्याध्यापिका निमिता गांधी नितीन कोल्हे सुलभा येलुकर, सचिन दही, उज्वला गावंडे, गायत्री इंगोले,रवींद्र वसे चैतन्य खारोडे, , अजय इंगळे, राकेश दांडेकर,शेक सलमान, सपना चोटियl, अंकुश अमानकर पूजा बाजारे मोहम्मद अतीक मुळे मॅडम कोरडे मॅडम ढोले मॅडम पाटील मॅडम मोरोकार सर संगीत शिक्षक अजिंक्य महल्ले, कलाशिक्षक नागपुरे सर, येऊल मॅडम, गौरव सर, चव्हाण मॅडम, संजना मॅडम ,सांगूनवेडे मॅडम जाजू, मॅडम बाजारे सर सिसोदिया मॅडम, डेरे मॅडम, मानके मॅडम, बाजारे मॅडम, गावंडे मॅडम,आस्वार मॅडम, सोनु मॅडम, गवळी मॅडम, अनिल सर, अनुप सर, जायले मॅडम खुमकार मॅडम, भड मॅडम इत्यादी शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे यशस्वी ते करता प्रयत्न केले.

