संतोष पोटपिल्लेवार
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी:-शिंपी समाज संघटना ता. घाटंजी ची महीला कार्यकारणी नेमणुक संदर्भात बैठक दि . 29/12/24 रोजी शिंपी समाज भवन घाटी घाटंजी येथे नुक्तीच पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिंपी समाज संस्था ता. घाटंजी अध्यक्ष सचिन कर्णेवार होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपाध्यक्ष विजय दिकुंडवार, सचिव शंकर पोटपेल्लीवार, काशिनाथ नोमुलवार होते. महींनी समाज प्रगतिसाठी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून समाज एकसंघ राखण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा यासाठी नुक्तीच महीला कार्यकारणी गठीत करण्यात आली. याबैठकीत उपस्थित महींलानी आपसात चर्चा करुन सौ.पुजा राजु दिकुंडवार यांची सर्वानुमते महीला अध्यक्ष पदी निवड केली. तर उपाध्याय सौ निलम सचिन कर्णेवार, सचिव पदी सौ राजश्री प्रशांत नोमुलवार, सहसचिव सौ पुजा उमेश अक्केवार, कोषाध्यक्ष सौ सुषमा उमेश अक्केवार यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त महीला कार्यकारणी चे उपस्थितांनी शब्द सुमनांने स्वागत केले. आगामी काळात महीलांचे संघटन मजबुत करुन समाज प्रगतीपथावर नेण्यासाठी व महींलाना समाज कार्यात जागृत करण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न करुन विवीध कार्यक्रम आयोजित करु असे मत सौ पुजा रा दिकुंडवार यांनी याप्रसंगि व्यक्त केले.बैठक योग्यरित्य पार पाडण्यासाठी सौ.विभा दिकुंडवार, वैशाली कर्णेवार, मिनाक्षी पोटपेल्लीवार, मंदा पोटपेल्लीवार,सविता पोटपेल्लीवार, वंदना दिकुंडवार, सुवर्णा दिकुंडवार, पुजा नोमुलवार, वैशु यन्नेवार, सरोज नोमुलवार, सिमा माकडवार, राणी उ. माकडवार, बेबीताई नोमुलवार सह ईतर ही महीलांनी परिश्रम घेत सहकार्य केले.

