भरत पुंजारा
ग्रामीण प्रतिनिधी पालघर
डहाणू : कासा-सायवण रस्त्यावर वाघाडी गावाजवळ रविवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात तीन बाईकस्वारांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मृत झालेल्यांची नावे राहुल हारके (कासा), मुकेश वावरे (कासा), आणि चिन्मय चौरे (चारोटी) अशी आहेत.
घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, राहुल हारके व त्यांचे सहकारी भरधाव वेगाने बाईकवर तिघे कासाकडे जात असताना त्यांची मोटारसायकल समोरून येणाऱ्या इको कारला जोरात धडकली. धडक इतकी भीषण होती की बाईकस्वारांना जागेवरच प्राण गमवावे लागले.
अपघातानंतर त्यांचे मृतदेह तात्काळ कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच कासा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.त्यांचा पुढील तपास सुरू आहे.
ही दुर्दैवी घटना कासा परिसरात शोककळा पसरवणारी ठरली आहे. अपघाताच्या कारणांचा शोध घेऊन वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

