सुरेश नारायणे
तालुका प्रतिनिधी, नांदगाव
नांदगाव : येथील कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डी.एम.राठोड यांची SCERT च्या शारीरिक शिक्षण व निरामयता या अभ्यासक्रमाच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , महाराष्ट्र राज्य शिक्षण धोरण-2020 च्या नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रम निर्मिती साठी निवड करण्यात आली आहे. त्यासाठी ची कार्यशाळा पुणे येथे दि. 30/12/2024 ते दि.3/1/2025 या काळात होणार आहे. या निवडी बाबत मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॳॅड. नितीन ठाकरे, नांदगाव तालुका संचालक अमित बोरसे, संस्थेचे कार्यकारणी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एन.भवरे उपप्राचार्य डॉ.एस.ए.मराठे, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद पाटील व कार्यकारिणीने प्रा.डी.एम.राठोड यांचे अभिनंदन केले आहे.

