मारोती बारसागडे
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली=अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालय हे अहेरी एटापल्ली. भामरागड.सिरोंचा मुलचेरा या तालुक्याच्या मध्ये असल्याने अहेरी उपजिल्हा रुग्णालयात महिन्यात एकदा अपंग.मूकबधिर.दिव्याग लोकांकरिता शिबीर झाल्यास आनलाईन सर्टिफिकेट काढण्यास मदत होईल.अहेरी. एटापल्ली.भामरागड.सिरोंचा. मुलचेरातील दिव्याग लोकांना गडचिरोली ये जा करण्याकरिता आर्थिक.मानसिक.शारीरिक त्रास होतो या करिता जिल्हा अधिकारी साहेब.व जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा चिकित्सक या गंभीर विषयावर लक्ष देऊन अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथे आनलाईन सर्टिफिकेट ची आरोग्य शिबीर दर महिन्यात लावावे अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संगठनेचे प्रदेश अध्यक्ष प्रणय खुणे विदर्भ अध्यक्ष जावेद अली. जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी तालुका अध्यक्ष फारुख शेख.जिल्हा उपाध्यक्ष महेश अलोणे.जिल्हा सचिव रतन दुर्गे.सदस्य सुरेश दुर्गे. रोशन अली सय्यद.मिलिंद अलोणे.शाम ओंडरे.अमोल अलोणे.साईनाथ औतकर.दीपक गुरनुले.रामदास ओंडरे. यांनी मागणी केली आहे.

