त्रिफुल ढेवले
ग्रामीण प्रतिनिधि मोर्शी,
मोर्शी : मोर्शी शहराला नगर परिषदेतर्फे पाणीपुरवठा केला जातो. यामध्ये अंदाजे 5000 च्या जवळपास ग्राहक शहरात आहे. यातील अनेक ग्राहकांनी पाणी बिल न भरल्यामुळे लाखो रुपयांचे बिल नागरिकांकडे थकीत असल्याचे नगर परिषदेचे म्हणणे आहे. नगरपरिषदेतर्फे मोर्शी शहराला सिम्भोरा येथून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, वीजबिलाची रक्कम न भरल्यामुळे महावितरणकडून 17 नोव्हेंबर ला वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. परंतु, नगर परिषद प्रशासनाच्या वतीने थकबाकी भरल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला होता. मात्र, पुन्हा वीजबिल न भरल्याने वीजपुरवठा खंडित केला आहे. परिणामी, मोर्शी शहराचा पाणीपुरवठा गेल्या दोन दिवासांपासून बंद आहे.
मोर्शी शहराला नगर परिषदेतर्फे पाणीपुरवठा केला जातो. यामध्ये अंदाजे 5000 च्या जवळपास ग्राहक शहरात आहे. यातील अनेक ग्राहकांनी पाणी बिल न भरल्यामुळे लाखो रुपयांचे बिल नागरिकांकडे थकीत असल्याचे नगर परिषदेचे म्हणणे आहे. त्यामुळे दर महिन्याला येणारे लाखो रुपयांचे वीजबिल भरण्यासाठी नगरपरिषदेकडे रक्कम राहत नाही. पर्यायाने वीजबिल थकीत राहते. आजच्या घडीला एक कोटीच्या जवळपास वीज बिल नगरपरिषदेकडे थकीत असल्याचे सांगण्यात येते. ही रक्कम न भरल्यामुळे महावितरणने नगरपरिषदेचा सिम्भोरा येथील मोर्शी शहरात येणाऱ्या पाणीपुरवठा विभागाचा वीजपुरवठा खंडित केला आहे.यापूर्वी सुद्धा नोव्हेंबर महिन्यात पाणी पुरवठा विभागाचा वीजपुरवठा खंडित केला होता. यातून नगरपरिषदेने कोणतीही सुधारणा न करता व सक्तीने रक्कम जमा न केल्याने पुन्हा वीज कपातीचे संकट उभे झाले. त्यामुळे मोर्शी शहराचा पाणी पुरवठा सुद्धा बंद झालेला आहे.पाणी मिळत नसल्याने फिरावे लागते वणवण गेल्या दोन दिवसांपासून मोर्शीकरांना पाणी मिळत नसल्याने त्यांना वणवण भटकावे लागत आहे. त्यातच तांत्रिक अडचणीमुळे पाणी पुरवठा करणारी यंत्रणा बंद पडली आहे. हे दुरुस्त करणारा औरंगाबाद येथून येणार असल्याचे समजल्याने आणखी दोन दिवस पाणी येणार नसल्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगरपरिषदेचे कोणतेही नियोजन नसल्याने मोर्शीकरावर पाण्याचे संकट येत आहे.

