सतिश गवई प्रतिनिधी तालुका उरण.
उरण :- उरण तालुक्यात द्रोणागिरी नोड जसजसा डेव्हलपर्स होत आहे त्याच अनुषंगाने उरण शहरात देखील लोकसंख्येची वाढ होत आहे कामानिमित्त अनेक भागातून अनेक प्रांतातून इथे लोक येत आहेत आणि आपले वास्तव्य करत आहेत परंतु लोकसंख्या जसजशी वाढते त्याप्रमाणे नागरी सुविधा मात्र उपलब्ध होत नाहीत आणि त्याचाच भाग म्हणून दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी हे समस्या सर्वांना भेडसावत आहे परंतु यावर उपाययोजना मात्र होत नाहीत आता आपण जर बघितलं तर वाहतूक कोंडी का होते याचे अनेक कारणे असली तरी उरणचे नाक म्हणून ज्याला आपण संबोधतो तो चार फाटा येथून पुढे उरण शहर हद्द सुरू होते पाहायला गेले तर उरण शहर हे खूप छोटे शहर आहे परंतु नियोजनबद्ध नसल्याने तेथील रस्ते हे एखाद्या गावातील रस्त्यांसारखे झालेले आहे चिंचोळ्या प्रकारे आणि त्याच्यात भर म्हणून की काय अनेक भाजीपाला दुकाने फळ दुकाने या भाजीपाला विक्रेते आणि फल विक्रेते यांनी रस्त्यावर अतिक्रमण करून जो काही रस्ता आहे तोही निमुळता केलेला आहे आणि त्याच्यात दिवसेंदिवस भर पडत आहे चार फाटा पासून जरा पुढे गेल्यानंतर चिंतामणी हॉटेल समोर त्या आनंद नगर कोपऱ्यापर्यंत दोन्ही बाजूला अनेक भाजीपाले दुकाने आणि फळ दुकाने ह्यांनी हा रस्ता काबीज केला आहे आणि यातूनच उरण शहरवासीयांना रोजचाच वाहतुकीचा सामना करावा लागत आहे रोज अशी वाहतूक कोंडी झाल्याने मोठ्या प्रमाणात वेळ पैसा वाया जात आहे त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण होत आहे तसेच ध्वनी प्रदूषण सुद्धा होत आहे सणाचे दिवस असले की मोठ्यात मोठ्या रांगा पूर्ण उरण शहरात लागल्या जातात तरी याच्यावर ठोस उपाय योजना गरजेचे आहे आणि ही दुकाने कुणाच्या आशीर्वादाने चालत आहेत आणि का चालली जात आहे याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे तरच उरण शहरवासी यांची ह्या समस्येतून मुक्तता होईल तरी संबंधित विभाग मग उरण नगरपरिषद असेल किंवा वाहतूक पोलीस नियंत्रण असेल सामाजिक संघटना असतील ह्या लोकांनी यात गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणात परप्रांतीय लोक उरण शहरात येत आहे.आणि छोटे मोठे व्यवसाय करत आहे पण तेवढीच त्यांची मुजोरी पण करत आहेत. म्हणून स्थानिक लोकांना त्यांच्या पासून नाहक त्रास होत आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.








