सुरतान पावरा तालुका प्रतिनिधी अक्राणी
ग्रामपंचायत सोन बु यांच्या वतीने २४/१२/१९९६ रोजी पेसा कायदा पारित करून आदिवासी बहुल भागात लागु केला पेसा कायद्यास २८ वर्ष झाल्याचे औचित्य साधून ग्रामपंचायत मार्फत विविध उपक्रम राबवून पेसा कायद्याची जनजागृती करण्यात आली त्यात आश्रम शाळा सोन खु ते ग्रामपंचायत कार्यालय पर्यंत आदिवासी संस्कृती चे दर्शन घडवत आदिवासी वाद्य ढोल, मांदल आदि वाजत गाजत घोषणा देत जनजागृती रॅली मोठ्या उत्साहात गावातुन काढण्यात आली. त्यांनतर ग्रामपंचायत कार्यालयात पेसा कायदा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश वसावे तालुका पेसा समन्वयक लाभले आणि यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आले. तत्पूर्वी गावातील जेष्ठ नागरिक लोटन बाब यांनी आदिवासी रीती प्रमाणे प्रतिमा पूजन कार्यक्रमास सुरुवात झाली. पेसा दिन राबविण्यात बाबतचे प्रस्ताविक ग्रामपंचायत अधिकारी अशोक पावरा यांनी सभेत सविस्तर पणे सांगितले त्यानंतर मेरसिंग पावरा पोलिस पाटील यांनी पेसा कायदा बाबत बोली भाषेत अत्यंत सविस्तर पणे मार्गदर्शन करुन त्यांचे महत्त्व विषद केले तसेच मगन पावरा यांनी देखील सुत्र संचालन बरोबर त्यांनीही पेसा कायदात आपल्यासाठी किती अधिकार आहे आणि यांच्ये महत्त्व उपस्थित ग्रामस्थांना संबंधित केलें या कार्यक्रमास सरपंच जयश्री पावरा, बजरंग दादा पावरा उपसरपंच, अशोक पावरा ग्रामपंचायत अधिकारी, मगन पावरा, मेरसिंग पावरा पोलिस पाटील, सुनील पावरा कृषी सेवक, डॉ रतीलाल पावरा, डॉ सुभाष पावरा, बी सी पावरा सर, आश्रम शाळा शिक्षक मनिषा पावरा, उषा पावरा, वंदना पावरा, अंगणवाडी सेविका पटले मॅडम, अनिल पावरा, फूदी बाई, सेवी बाई, फकिर पावरा, जुहऱ्या दादा पावरा, संजय पावरा, वसंत पटले, फकिर पटले, विरसिंग पावरा, मोबिलयझर काळुसिंग पावरा, पिटां पावरा, किसन पटले, तेरसिंग पावरा गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी आश्रम शाळा जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी आदी कार्यक्रम साठी उपस्थित होते.


