आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजीराष्ट्रधर्म युवा मंचच्या “सेवा गौरव” 2024 पुरस्काराचे वितरण
गजानन डाबेराव ग्रामीण प्रतिनिधी नांदुरा
नांदुरा,:- सध्या सर्व जग झपाट्याने प्रगती करत असले तरी आंतरिक कलहासह देशांतर्गत युद्ध पाहायला मिळत आहे.भारताने मात्र नेहमीच शांततेच्या मार्गाने विकासात्मक धोरण ठेवून जगासमोर आदर्श ठेवला आहे, त्यामध्ये राष्ट्रसंतांचा महत्त्वाचा वाटा आहे.विकसित राष्ट्रांसाठी सुसंस्कृत पिढी महत्त्वाची असते आणि संस्कारीत पिढी घडण्यासाठी राष्ट्रसंतांच्या विचाराची गरज असते असे संस्कार मूर्ती आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजी यांनी वाडी येथे दिनांक 22 डिसेम्बर रोजी झालेल्या राष्ट्रधर्म युवा मंचच्या सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी प्रबोधन केले.राष्ट्रधर्म युवा मंचच्या सेवा गौरव पुरस्कार 2024 चे वितरण आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजी यांच्या हस्ते पार पडले.यामध्ये नांदुरा येथील शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिकेचे प्रणेते व शेतकरी कन्या पुत्र एमपीएससी यूपीएससी शैक्षणिक क्रांती संघटनेचे संस्थापक राजेश गावंडे यांना अभ्यासिका व शैक्षणिक कार्यासाठी,भजन,कीर्तन प्रबोधनाद्वारे राष्ट्रसंत व महापुरुषांचे विचार आपल्या कीर्तन व प्रवचनातून प्रसार करणारे श्री सुनील गाईनकर तसेच दहा वर्षापासून बुलढाणा जिल्हा व जिल्हा बाहेरील रुग्नांना आरोग्यदुत म्हणून सेवा दिल्याबददल मोताळा येथील विकास सिंह राजपूत यांना अबॅकस,वैदिक गणित विषयात देशभरात ६८ केंद्रांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल समर्थसिंह पाटील यांना ग्रामस्वछता, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, व्यसनमुक्ती अभियान, सर्वाधर्मीय समुदायिक प्रार्थना या सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्याबद्दल माटरगाव येथील प्रदीप गणेशराव सरोडकर यांना सुद्धा 2024 चा ‘सेवा गौरव` पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात नांदुरा येथील भारतीय संगीत कला केंद्राचे प्रा वा वि भगत यांच्या संगीत गायनाच्या कार्यक्रमाने झाली.यावेळी डॉ मनोज महाराज पाटील,मनीष देशमुख,ठाणेदार नागेश जायले,श्रीकृष्ण चव्हाण,खंडारकर, गणेश मुक्तारसिंग राजपूत,दीपक कानजडे,आधारसिंग मोरे,गणेश कहाते,मनोज पाटील,किशोर दादा,आनंद जवंजाळ,स्वप्निल भगत,श्याम हागे, कैलास भोपळे,रवी खंडारे, संजय वाघमारे,विठ्ठल पाटील, राम दादा देशमुख यांच्या सह परिसरातील महानुभावांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप सिंह जाधव यांनी केले.








