मनोज गवई जिल्हा प्रतिनिधी अमरावती
चांदुर रेल्वे तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेचे समजली जाणारी चिरोडी ग्रामपंचायत मध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरपंच पदी सौं अर्चना दारासिंग राठोड यांची अविरोध निवड करण्यात आली.सविस्तर वृत्त असे की ग्रामपंचायत चिरोडी येथे 2021मध्ये सार्वत्रिक निवडणुकीमध्ये माला राजेश चव्हाण ह्या सरपंच पदी निवडून आले परंतु 9 सप्टेंबर 2022 मध्ये त्यांनी पंधरा वित्त आयोग या योजनेमधून दोन लक्ष रुपयाचा अपहार केल्यामुळे त्यांना माननीय विभागीय आयुक्त अमरावती यांनी सरपंच पदावरून अपात्र घोषित केले त्यामुळे चिरोडी ग्रामपंचायतचे सरपंच पदरिक्त होते रिक्तअसलेल्या सरपंच पदावर पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालय यांचे मार्फत निवडणूक लावण्यात आली त्यामध्ये सौ अर्चना दारासिंग राठोड भाजपा यांचा एक मात्र अर्ज असल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.ग्रामपंचायत सदस्यलता अर्जुन जाधव, वर्षा अनिल जाधव, अलका प्रवीण मसराम, निवडणूक निर्णय अधिकारी म्ह्णून निलेश स्थूल होते.