भूमिपुत्र संघटनेचा पुढाकार
सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी वाशिम
वाशिम – कोरोनाच्या कठीण काळात अनेकांचे हाल होत आहेत.अशातच रुग्ण व त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांना जेवणाची व्यवस्था व्हावी या उद्देशाने रिसोड येथील पोलीस मित्र परिवार, व्यापारी मंडळ व समाजसेवक यांचे वतीने गेले 19 एप्रिल पासून अखंड अन्नदान कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आसुन वाशीम येथील रुग्णांनाही रिसोड इथूनच डब्बे पुरवले जात आहेत.या समाज कार्याचे कौतुक व्हावे म्हणून भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या पुढाकारातून रिसोड तहसीलचे तहसीलदार अजित शेलार, ठाणेदार जाधव साहेब, स्टेट बँक व्यवस्थापक बलभद्र भुत्तो, भूमिपुत्रचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर , शहर अध्यक्ष विकास झुंगरे, रवि पाटिल जाधव, सिताराम इंगोले, अर्जुनराव तुरूकमाने, डाॅ. राम बोडखे, डाॅ. खानझोडे आदींच्या वतीने पोलीस मित्र व या सेवा कार्यात अखंड योगदान देणाऱ्या सेवाधारी यांचा सत्कार करण्यात आला.याबाबत लॉक डाऊन मध्ये सर्वच बंद असताना रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांची होत असलेली गैरसोय पाहता रिसोड येथील हिंगोली नाका परिसरात रुग्णांसाठी व त्यांचे नातेवाईकांसाठी 19 एप्रिलपासून अन्नदान कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. मात्र या कार्यक्रमाची व्याप्ती वाढत रिसोड येथील अखंड अन्नदानाचे रूपांतर वाशीम पर्य॔त पोचले आहे. वाशिम येथील रुग्णांसाठी ही येथून डबे पुरवली जातात. दिवसाला एक हजार डबे बनवुन रिसोड व वाशीम साठी पाठवले जातात. कार्यक्रमासाठी रिसोड शहरातील दानशूर व्यक्ती सोबतच पोलीस मित्रपरिवार व प्रशासनाचे सुद्धा सहकार्य लाभत आहे. त्यामुळेच स्वयंपाक बनवनारे, डबे पॅक करून रुग्णांपर्यंत पोहच करनारे सर्व सेवाधारी यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन भूमिपुत्र कडुन वरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी शहरातील समाजसेवक व्यापारी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.याकार्यक्रमासाठी दिवसेंदिवस अन्नदात्या कडून मदतीचा ओघ वाढत असून हे एक अतिशय चांगले कार्य असल्याचे गौरवोद्गार वरील मान्यवरांनी यावेळी आपल्या भाषणातुन काढले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन खंदारे तर आभार रवी अंभोरे यांनी केले.