खताच्या वाढवलेल्या किमती घेतल्या मागे
सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी वाशिम
पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीचे कारण देत केंद्र सरकारने अचानक DAP सह सर्वच खताच्या किमती अचानकपणे मोठया प्रमाणावर वाढवल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांवर कोरोना च्या प्रतीकुल काळात मोठा अर्थिक ताण पडणार होता. भूमिपुत्र ने सर्वप्रथम किमती विरोधात आवाज बुलंद केला. प्रींट मीडिया, सोशल मिडिया, इलेक्ट्रॉनिक मीडीया सह सर्व स्तरातून खत भाव वाढीला भूमिपुत्र कडुन विरोध करण्यात आला.त्यामुळेच शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात रोष तयार झाला होता. सरकार मधील काही मंत्री व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून खत दर वाढीचे समर्थन करत असतांना व्यापारी आणि खत कंपन्यांवर खापर फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला गेला. जुना खताचा स्टाॅक उपलब्ध असल्याचे कारणही देण्यात आले पंरतु मोठया प्रमाणावर अचानक केलेल्या दरवाढीचे समर्थन होणे शक्य नव्हते. त्यामुळेच शेतकऱ्यांमधील असंतोष पाहता अखेर सरकारने प्रती बॅग बारासे रूपये अनुदान वाढवून खतांच्या वाढवलेल्या किमती मागे घेतल्या. या निर्णयाचे भूमिपुत्र स्वागत करीत आसुन शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असल्याचे भूमिपुत्र चे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी सांगीतले.