पवनसिंग तोडावत
ग्रामीण प्रतिनिधी अंधानेर
कन्नड: लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती अंधानेर ग्रामपंचायत कार्यालयात साजरी करण्यात आली.त्या प्रसंगी अशोकराव दाबके सरपंच, साहेबराव गवळे,तनुजा शेलार यांनी आण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर प्रबोधन पर भाषण केले त्या प्रसंगी खालील ग्रामस्थ उपस्थित होते.सरपंच अशोकराव दाबके,उपसरपंच रिजवानाबी रशिद शेख,माजी सरपंच कैलास राऊत ,तंटामुक्त अध्यक्ष संजय पांडे ग्रामविकास अधिकारी माणिकराव पगारे ,कचरू नेवगे,जयसिंग जाखड, साहेबराव गवळी, वाल्मिक वाघ,मनोज बागले,चंद्रभान शेलार,तातेराव खाजेकर,रामचंद्र साठे,साहेबराव लोखंडे व ग्रामस्थ ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.