अभिजीत फंडाट ग्रामीण प्रतिनिधी मोरगाव भाकरे
बाळापूर तालुक्यातील ग्राम निंबा फाटा येथे १ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास अच्यानक बळीराम उगले या व्यक्तिने दारूच्या नशेत पत्रकार अंकित क-हे यांना काही कारन नसल्या नंतरही मारहाण केली व शिवीगाळ करून मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ (मुंबई) बाळापूर तालुक्यातील पत्रकारांनी जाहीर निषेध करून आरोपी विरूद्ध ३२३ ५०४ ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे या घटनेमुळे बाळापूर तालुक्यातील पत्रकार बांधव तिव्र नाराजी व्यक्त करीत जाहीर निषेध करीत आहेत.ही घटना निंबा फाटा येथील तेल्हारा रोडवर उभे असलेले पत्रकार अंकित क-हे यांच्या वर दारूच्या नशेत बळिराम उगले यांनी मारहाण चालू केली व शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे त्यामुळे परिसरात अचानक खळबळ उडाली असून आरोपीला उरळ पोलीसांनी तातडीने अटक करावी अशी मागणी पत्रकार बांधवांनी व्यक्त केली आहे.बाळापूर तालुक्यातील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ (मुंबई) बाळापूर तालुका उपाध्यक्ष सुरेश घ्यारे, बाळापूर तालुका उपाध्यक्ष प्रभुदास अावारे, तालुका सचिव शुभम ताले, सहसचिव अभिजित फंडाट,संघटक पुरूषोत्तम घ्यारे, सह संघटक देवराव परघरमोर, महासचिव आकाश उमाळे, कार्याध्यक्ष विष्णू वराळे, यांनी जाहीर निषेध करून तातडीने आरोपीला अटक करावी व आरोपी विरूद्ध पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी व्यक्त केली जात आहे . पत्रकार अंकित क-हे यांना चापटांनी मारहाण केली व पत्रकारांना जातीवादावरू शिवीगाळ केल्या प्रकरणी आरोपी विरूद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे मात्र आरोपींला तातडीने अटक करावी पत्रकार हा देशाचा चौथा आधार त्रंभ आहे व जनतेच्या कामासाठी झटनारा कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता त्यांना लोक दारूच्या नशेत मारहाण करून जिवे मारण्याच्या धमक्या देत आहेत त्यामुळे पत्रकार तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे तरी तातडीने आरोपीला अटक करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ (मुंबई) बाळापूर तालुका कार्यकारिणीच्या वतीने करण्यात येत आहे .
पत्रकार अंकित क-हे
मी १ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजता तेल्हारा रोडवर उभे असतांना अचानक दारूच्या नशेत आलेल्या बळीराम उगले या व्यक्तिने अचानक मारहाण व शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत त्यामुळे माझ्या जिवाला धोका निर्माण झाला आहे तरी आरोपीला अटक करण्यात यावी पत्रकार अंकित क-हेआरोपीवर पुढील प्रमाणे ३२३ ५०४ ५०६ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनंत वडतकर तसेच बिट जमादार करीत आहेत अशी माहिती समोर आली आहे.











