अरविंद बेंडगा तालुका प्रतिनिधी, तलासरी
तलासरी :- तलासरी तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतून पैसे काढणे आणि KYC प्रक्रियेकरिता सामान्य नागरिक, विशेषतः आदिवासी महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बँकेबाहेर रांगा लांबच लांब लागलेल्या असून, नागरिक दिवसभर उन्हात-ताणात उभे राहत आहेत.KYC अनिवार्य केल्यामुळे बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. मात्र, बँक प्रशासनाकडून ग्राहकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत आहे. सावली किंवा पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यानं ग्राहक त्रस्त होत आहेत. यासंदर्भात नागरिकांकडून मागणी करण्यात आली आहे की, बँक प्रशासनाने गर्दी व्यवस्थापनासाठी उपाययोजना करावी आणि सावली व पाण्याची सोय तत्काळ उपलब्ध करून द्यावी.अशा प्रकारच्या अडचणींमुळे स्थानिक पातळीवर बँकिंग सेवांचा लाभ घेणे सामान्य नागरिकांसाठी अवघड झाले आहे. योग्य सुविधा पुरवल्यास हा ताण काही प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








