सुरतान पावरा तालुका प्रतिनिधी अक्राणी
लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजपच्या माजी खासदार हिना गावित यांनी कंबर कसली आहे त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी हिना गावित यांना पराभवाची धुळ चारली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघात इच्छुकांची संख्या संख्या वाढली आहे. त्याठिकाणी के सी पाडवी हे काँग्रेसचे विद्यमान उमेदवार आहेत. गोवाल पाडवी हे आमदार के सी पाडवी यांचे पुत्र आहेत भाजपच्या माजी खासदार डॉ हिना गावित यांनी देखील अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघातून इच्छुक आहेत.








