स्वरूप गिरमकर ग्रामीण प्रतिनिधी शिरूर
शिरूर : आलेगावं पागा येथील युवा उद्योजक कौस्तुभ दादा लवांडे यांनी राहू येथे फ्लेक्स ग्राफिक हया व्यवसायात पदार्पण करत ग्रामीण भागातील युवा वर्गाला उद्योजकातून विकास करण्याचा संदेश या माध्यमातून दिला आहे. दुकानाचे उदघाटन योगीराज उद्योग समूहाचे चेअरमन राहुल दादा करपे पाटील यांच्या हस्ते पार पडले, यावेळी तरुणांना संबोधित करताना राहुल करपे म्हणाले आजची पिढी ही भारताचे भविष्य आहे. जीवनात संघर्ष असतो, परंतु जिद्द असल्यास यशाकडे जाता येते. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार असतात. मात्र, सतत शिकत रहा, या क्षेत्रात भरपूर संधी आहेत.याप्रसंगी उपस्थित राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते पुणे जिल्ह्याचे जेष्ठ नागरिक संघाचे आध्यक्ष नामदेव गिरमकर, उप सरपंच लालासाहेब वाघचौरे , बाळासाहेब वाघचौरे, उपसरपंच राहुल दादा रणदिवे रांजणगाव सांडस, कालिदास हरिहर ग्रामपंचायत सदस्य आलेगाव पागा, उद्योजक प्रशांत दादा हंबीर, उद्योजक मयूर दादा वडघुले, उद्योजक अमोल वडघुले, जयदीप वाघचौरे, आधी कार्यकर्ते मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रसंगी या नवीन फ्लेक्स ग्राफिक्स उद्योजक कौस्तुभ दादा लवांडे यांना शुभेच्छा दिल्या. शेवटी कौस्तुभ लवांडे यांनी सर्वांचे आभार मानले व त्यानंतर सर्वांना स्नेह भोजनाचे आयोजन त्यांच्या वतीने करण्यात आले होते.








