महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती, दि.30:-भद्रावती येथील जिल्हा परिषद हायस्कुलची इयत्ता आठवीत शिकणारी विद्यार्थीनी गायत्री पांडे हिने नुकत्याच पार पडलेल्या एन. एम. एस. एस. परीक्षेत यश मिळवित आपल्या शाळेला नावलौकीक मिळवून दिला आहे.फक्त इयत्ता आठविच्या विद्यार्थांसाठीच असलेली ही परीक्षा २१ मार्च २०२१ मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेत यश संपादन करून शाळेचे नाव उंचावल्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर यांनी गायत्रीला पेढा भरवून तिचे अभिनंदन व भविष्याच्या शैक्षणिक वाटचालीबद्दल तिला शुभेच्छा दिल्या. आपल्या यशाचे श्रय गायत्रीने आपल्या आई व शिक्षकांना दिले आहे.याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.यावेळी स्वेता लांडगे, स्वेता आगलावे, राजू हिवांज, सुनीता भास्करकर, शंभरकर सर, परचाके सर आदी उपस्थित होते.