स्वरूप गिरमकर ग्रामीण प्रतिनिधी शिरूर
शिरूर : लोकसहभागातून जन सर्वांगीण विकास माती आणि माता सुरक्षित व्हावी या पवित्र उद्देशाने असंख्य सेवाभावी लोकांच्या सहभागातून व संस्थापक अध्यक्ष कैलास पवार यांच्या मुख्य संकल्पनेतून स्थापित भूमी फाउंडेशन ही सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, ग्रामीण भाग विकास, अनाथ निराधार मुले तसेच विधवा निराधार महिलांसाठी इत्यादी क्षेत्रात उत्कृष्टरित्या राज्यस्तरीय स्वरूपाचे कार्य करीत आहे. त्याचबरोबर संस्थेचे सावित्रीबाई मुलींचे निवासी शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प वाघोली पुणे येथे रक्षाबंधन या पवित्र सणाच्या निमित्ताने एक राखी पोलीस बांधवांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामध्ये पुणे जिल्ह्यातील असंख्य पोलीस बांधव सहभागी झाले होते.यावेळी महिलांसाठी सदैव तत्पर असलेल्या पोलीस विभागातील कर्तव्यदक्ष महिला अधिकारी विजयाताई वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली व मा.एअर फोर्स अधिकारी व जनरल मॅनेजर जेट्रोल इंडिया प्रा.लिमि.पुणे एस.के. पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्षाबंधन कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी विजयाताई वंजारी व प्रा. सुभाष शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी सर्व मान्यवरांनी प्रकल्पाची पाहणी केली त्याचबरोबर प्रकल्पातील विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास व दिनक्रम,कार्यप्रणाली,व्यवस्था ही सर्वांगीण दृष्ट्या सुसज्ज असल्याचे सांगितले.यावेळी बी.जे.एस कॉलेजचे विभाग प्रमुख प्रा.सुभाष शिंदे,रिव्हर्सस्टोन एज्युकेशन ग्रुपचे संचालक अविनाश शर्मा,अरसेलर मित्तल निप्पॉन स्टील ग्रुपचे धनराज वाळके,लोणीकंद पोलीस स्टेशनचे पो.कॉ.नितीन मोरे,पो.कॉ.सिद्धांत ढवळे,उद्योजक अशोक घायाळ पाटील,जयश्रीताई वाळके, राजन खेडेकर,जगदीश प्रजापति,अभय आगवान,राकेश केदारी,अनिता पवार, आशा तांगडे,प्रकल्पातील विद्यार्थिनी, कर्मचारी व असंख्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.








