योगेश मेश्राम ग्रामीण प्रतिनिधी चिमूर
भारतीय किसान संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र यादव यांनी भा.कि.संघटनेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी जगदीश रामटेके यांची निवड केली असता जिल्हाध्यक्ष यांनी हुतात्मा स्मारक चिमूर येथे रविवारला सभा आयोजीत करून भारतीय किसान संघटनेची चंद्रपूर जिल्हा कार्यकारणी गठीत केली.उपाध्यक्ष वामन लहानू गेडाम, सचिव गुलाब कचरू गेडाम, सहसचिव संदेश शंकर रामटेके, कोषाध्यक्ष मंगेश परसराम थेरकर, सल्लागार ॲड विलास मोहुर्ले, कार्याध्यक्ष दिपक विलास वाघमारे, संघटक नरेश तानबा गजभीये, सदस्य अशोक किसन भिमटे, सदस्य बंडू परसराम तराळे, सदस्य लालाजी शिवराम शेंडे आदी पदाधिकारी, सदस्य यांची निवड करण्यात आली.