सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
पंचायत समिती मेहकर अंतर्गत येत असलेल्या ग्राम पंचायत
अंजनी बु येथील ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून विविध प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण व आत्मदहना सारखी आंदोलने करत असतात.परंतु यांच्या या विविध समस्या कडे आजवर कोणीही लक्ष घालत नसल्याने तसेच म्हणून सर्व ग्रामस्थ यांना कंटाळून निराश होऊन हतबल झाले आहेत. पंचायत समिती मेहकर चे गटविकास अधिकारी पवार हे तक्रारीचा पाठपुरावा करूनही कोणताही प्रतिसाद देत नाही.त्यामुळे कर्मचाऱ्यांवर व ग्रामसेवक यांच्यावर कोणतीही वचक राहिलेली नाही त्यामुळे यांच्या या बेजबाबदार कार्यभारावर तालुक्यातील अनेक लोक नाराजी व्यक्त करत असतात.एक तर यांना समस्या साठी भेटण्यासाठी गेल्यावर यांना सर्वसामान्य जनतेला बोलायला वेळ नसतो यांनी बाजू नीट ऐकून सुध्दा घेत नसतात.त्यामुळे अंजनी येथील ग्रामस्थ हे जिल्हाधिकारी तसेच मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदनात सांगितले आहे की.या सर्व प्रकारची वरीष्ठ उच्च श्रेणी अधिकारी यांच्या हस्ते संपूर्ण 2014 पासूनच्या आजपर्यंत च्या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन दोषी वर फौजदारी स्वरूपाची कार्यवाही होणे गरजेचे आहे.त्याचबरोबर ग्रामपंचायत अंजनी बु मध्ये घरकुल, शैचालय,घर कर,पानीपट्टी कर व गाव नमुना 8 इतरही सर्वच प्रकारची चौकशी करण्याची मागणी मध्ये म्हटले आहे. व त्याचे प्रति पुढील कार्यवाहीस्तव .मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. .विरोधी पक्ष नेते,.ग्रामविकास मंत्री, .सामायिक न्याय मंत्री, .ग्राम समिती केंद्रीय अध्यक्ष ,.पंचायत राज समिती अध्यक्ष, .पालकमंत्री,यांना सुध्दा प्रति दिल्याचे सांगितले आहे.निवेदनात ग्रामस्थ उशाबाई नागोलकर,सुरेशराव आढाव मा.सभापती, राम राऊत ,अमोल शेवाळे,ग्रा.प.सदस्य,समाधान पदमने, गजानन नागोलकर,विष्णू ढोले,कविता नागोलकर,अशोक,नागोलकर,शंकर पायघन, दिलीप आल्हाट,ओम,ढोले,विशाल लाड,दिगांबर त्र्यंबके,आश्रू लाड,हनुमान पायघन, देविदास वाठ,हनुमान चंदनशिव,दत्ता पारिस्कर, रवी नागोलकर आदींच्या सह्या आहेत. जर का संबंधित अधिकारी यांनी तात्काळ विनाविलंब कार्यवाही केली नाही किंवा पुढील कार्यवाहीस टाळाटाळ करून ढवळा-ढवळ केल्यास जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा दिला असून त्या नंतर कोणतीही सामाजिक शांतता भंग झाल्यास किंवा कोणताही अनुचित प्रकार घडून आल्यास त्यास संबंधित अधिकारी जबाबदार असाल याची दक्षता घ्यावी व तक्रार निकाली काडण्यास प्रथम प्राधान्य देण्यात येऊन सहकार्य करावे असे नमूद केले आहे. आता वरीष्ठ अधिकारी चौकशी कधी करणार व काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.