गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा:-तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव परीसरात खरीप हंगामातील पिके बहरलेली असताना गुरुवार दिनांक 22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टी मुळे शेकडो एकर क्षेत्र बाधित झाले. असून कृष्ण मंदिर जवळपास नाल्याच्या काठावरील शेती मध्ये पाणी शेतात आल्याने या क्षेत्रावरील पिके धोक्यात आल्याचा अंदाज आहे. खरीप हंगामाच्या आरंभी पावसानी दडी मारल्याने दुबार पेरणीचे आता तर पिके बहरलेली असतात ना अतिवृष्टीमुळे झालेले नुसकान यामुळे शेतकरी हतबल बनला असून पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी होत आहे या आठवड्यातील अतिवृष्टीमुळे शेतात पाणीच पाणी साठवून पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यासंदर्भात रामदास शंकरराव पिंगळे यांचे शेतात खुप प्रमाणात नुकसान झाले आहे पावसाने अनेक ठिकाणी पुराचे पाणी शेतात असल्याने पिके पिवळी पडली तर काही पिके सडली आहेत शेतकऱ्यांचे अतोनात नुस्कान झाले आहे .जून ते जुलै च्या सहा आठवड्यांच्या कालावधीत पावसाअभावी पिके यांची उत्पादन क्षमता घटली होती. पावसाअभावी आणि आता पावसामुळे पिकांची अवस्था दयनीय बनली आहे अनेक भागातील शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. सद्यस्थितीत पिके बावरलेली असताना नुसकान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीचे पंचनामे करून शासनाकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.
गत चार पाच दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याकाठावरील माझ्या शेतात पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पिके पाण्याखाली गेल्याने नुकसान झाले.नुकसान झालेल्या भागांचा कृषी विभाग व महसूल विभागाने पाहणी करून पंचनामे करण्यात यावे शासनाने आर्थिक मदत द्यावी
रामदास शंकरराव पिंगळे
शेतकरी गाडेगांव
चार पाच दिवस झाले तरी पंचनामे झाले नाही कृषी विभाग व महसूल विभागाने पाहणी करून पंचनामे करण्यात यावे यासंदर्भात पुराचे पाणी शेतात असल्याने पिके पिवळी पडली आहे शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत द्यावी
सौ.शारदा गोकुळ हिंगणकर
सदस्या ग्राम पंचायत गाडेगांव