सार्वजनिक बांधकाम उपविभागाला दिला रास्ता रोको आंदोलनाचा इशारा.
योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर
चंद्रपूर (२९ जुलै)- चिमूर तालुक्यातील बोरगाव बुट्टी ते सिरसपूर शिवरा रोडवर खूप मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत व या खड्यांमुळे शेतकऱ्यांना व शेतमजुरांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आंबोली ग्राम पंचायत चे सदस्य व सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे चिमुर तालुका अध्यक्ष शुभम मंडपे यांनी बोरगाव बुट्टी ते सिरसपूर शिवरा या मार्गाची त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे. व सार्वजनिक बांधकाम उपविभागाला निवेदन देऊन रास्ता रोको आंदोलनाचा इशाराही दिला आहे. ह्या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना व शेतमजुरांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. व हे रास्तावरील खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत. या रस्ताने बोरगाव बुट्टी व शिवरा सिरसपूर येथील शेतकरी व शेतमजूर व अन्य प्रवासी जात असतात मात्र या रस्त्याकडे स्थानिक प्रशासनाचे व सर्वांजिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. तरी बोरगाव बुट्टी व सिरसपूर शिवरा रस्त्याची त्वरित उपपयोजना करावी अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल याचे निवेदन सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय चिमुर येथे देण्यात आले. यावेळी आंबोली ग्रामपंचायत सदस्य व सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे चिमुर तालुका अध्यक्ष शुभम मंडपे , सामाजिक कार्यकर्ते मधुकर नागपुरे, सत्यवान नगराळे , रोहित गेडाम व सम्यक चे पदाधिकारी उपस्थित होते व बोरगाव बुट्टी येथील शेतकरी शुभम वाघमारे व सुमित गायकवाड उपस्तीत होते.











