मनोज गवई जिल्हा प्रतिनिधी अमरावती
चांदुर रेल्वे : महिलांची लोणचे खरेदी करण्यासाठी बाजारात दाखल महिला वर्षभरासाठी ज्या गोष्टीची साठवणूक केली जाते. असे लोणच्याचे आंबे बाजारात दाखल झाले त्यानिमित्त शहरातील बाजारामधील गावरान, आंब्यांचे, रामकेला दाखल होऊन खरीदी साठी महिला व पुरुषांची खरेदीसाठी गर्दी होत आहे. आंब्याचं लोणचं म्हटलं की कोणाच्याही तोंडाला पाणी सुटणारच त्यातही आज काल विशिष्ट प्रकारचे अनेक मसाले उपलब्ध झाल्यामुळे महिला लोणचं हे चवदार बनवीत असतात.जून जुलै हा काळ महिलांसाठी लोणचे बनविण्यानंतर ते वर्षभर कसे टिकेल, त्यांची चव कशी कायम चांगली राहील यासाठी महिला मन लावून काम करीत असतात. आज बाजारामध्ये गावरान आंबे व लोणच्यासाठी प्रसिद्ध असलेला राम केला हे आंबे दाखल झाले आहेत. चांदुर रेल्वे शहरांमध्ये रोज दहा क्विंटल च्या जवळपास आंबे बाजारात दाखल होत असतात. अमरावती मार्केट मधून आल्यानंतर दिवसभरात पूर्ण आंबे कसे विकल्या जातील याची स्पर्धा या व्यवसायिकामध्ये सुरू असते. साठ रुपयापासून ते शंभर रुपयापर्यंत किलोचे दर आहेत.


