सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
दिनांक 26 जुलै 21 ला मौजे उसरण तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने क्रोप शोप प्रकल्पांतर्गत शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले ह्या शेतीशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे ही शेतीशाळा दोन्ही पद्धतीने प्रत्यक्ष शेतावर व ऑनलाईन पद्धतीने सहाय्यक कृषी अधिकारी फेसबूक पेज व फार्मबुक युट्युब चॅनेल च्या माध्यमातून राज्यासाठी थेट प्रक्षेपित करण्यात आली या शेतीशाळेस ऑनलाइन झूम या ॲपद्वारे राज्याचे कृषी संचालक माननीय दिलीप झेंडे व मुख्य गुणनियंत्रण अधिकारी महेश झेंडे उपस्थित होते. ही शाळा उसरण येथील ज्ञानेश्वर शेळके यांच्या शेतावर सोयाबीन पिकावर घेण्यात आली या शाळेमध्ये 25 हून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.सदर शेती शाळेस विठ्ठल धांडे शेतीशाळा तज्ञ तथा कृषी पर्यवेक्षक यांनी मार्गदर्शन करताना शेती शाळा म्हणजे काय? शेती शाळेचे वेळापत्रक? सोयाबीन पिकाचे निरीक्षण कशी घ्यायची? व निरीक्षणाच्या आधारे सोयाबीन पिकांमध्ये विविध निर्णय कसे घ्यायचे याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले शेती शाळेमुळे मुळे शेतकऱ्यांमध्ये निर्णय क्षमता वाढण्यास मदत हे शेती शाळेत सांगण्यात सांगण्यात आले यादरम्यान शेतकऱ्यांनी स्वतः सोयाबीनचे निरीक्षण घेतली चार्ट तयार केले चर्चा करून फवारणी निंदणी व पाणी देण्यासंदर्भात निर्णय घेतला या याचे सादरीकरण चार्ट द्वारे करण्यात आले व ते यूट्यूब चैनल वर लाईव्ह करण्यात आले होते शेतकरीसुद्धा मोठ्या उत्साहाने शेतीशाळा मध्ये सहभागी झाले आजच्या शेती शाळेमधून शेतकऱ्यांनी ढोबळ मानाने फवारणीचा निर्णय न घेता निरीक्षणाच्या आधारे घेतल्यास वेळेत व कीटकशकावरचा खर्चात बचत होते हे पटवून देण्यात आले. यावेळी ऑनलाईन शेती शाळेच्या माध्यमातून दिलीप झेंडे कृषी संचालक पुणे यांनी शेतकऱ्यांनी उत्तम गुणवत्ता असलेले सोयाबीन बियाण्याची निर्मिती करून गावातल्या बियाणे गावातच बीज प्रकार करून शेतकऱ्यां ना पुरवावे व उद्योजक बनावे असे आवाहन केले तसेच महेश झेंडे गुणनियंत्रण अधिकारी यांनी सुद्धा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत शेतीमध्ये कमी खर्चाचे नवनवीन प्रयोग करून उत्पादन खर्चात बचत करून शेती शाळेच्या माध्यमातून उत्पन्नात वाढ करावी असे मत व्यक्त केले या वेळी सदर शेती शाळेस तालुका कृषी अधिकारी विजय सरोदे कृषी पर्यवेक्षक विनोद मोरे कृषी सहाय्यक संतोष गायकवाड,लहाणे,सिरसाट, तुपकर,खंदारे, कृषी विभागाची इतर अधिकारी कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











