महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती दि.25:- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी संलग्नित असलेल्या टीम राहुल गांधी काँग्रेसच्या चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी भद्रावती येथील श्री साई खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे संचालक तथा काँग्रेस कार्यकर्ते किशोर विश्वनाथ पत्तीवार यांची निवड करण्यात आली. टीम राहुल गांधी काँग्रेसचे राष्ट्रीय वरिष्ठ सचिव कमलेश गुप्ता यांनी एका पत्रकाद्वारे सदर नियुक्ती केली आहे. किशोर पत्तीवार हे शहरातील काँग्रेसचे कार्यकर्ते असून ते पक्ष पक्षासाठी सतत कार्यरत आहे. त्यांच्या निवडीमुळे टीम राहुल गांधी काँग्रेसचे कार्य जिल्ह्यात वाढीस लागून त्याचा फायदा पक्षाला होईल असा विश्वास या नियुक्ती पत्रातून व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे शहरात तथा जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.


