देवलाल आकोदे, सर्कल प्रतिनिधी हसनाबाद
भोकरदन तालुक्यातील मौजे जानेफळ दाभाडी येथील ग्रामसेवक विठ्ठल नागरे हे गावातील ग्रामपंचायत कार्यालय ठिकाणी येत नसल्यामुळे,त्यांच्या सततच्या गैरहजेरीमुळे गावातील अनेक नागरिकांची तसेच शाळेतील मुलांची ग्रामपंचायत कार्यालयातील कामे वेळेवर होत नाही.त्यामुळे अनेकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.ग्रामपंचायत मधील विविध प्रमाणपत्रे दाखले देण्याचे काम ग्रामपंचायतीचे सचिव म्हणून कार्य करणारे ग्रामसेवक यांच्याकडे असते परंतु जवळपास पंधरा ते वीस दिवसापासून संबंधित ग्रामसेवक गावात न आल्यामुळे अनेकांची कामे रखडले असून त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.याबाबत संबंधित सरपंच मिसाळ यांनीही गटविकास अधिकारी यांच्याकडे तोंडी तक्रार केलेली आहे.या बाबीकडे गट विकास अधिकारी,भोकरदन यांनी लक्ष देऊन संबंधित ग्रामसेवक यांना मुख्यालय राहण्यासाठी लेखी आदेश काढून गावकऱ्यांसह विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी किंवा संबंधित ग्रामसेवक यांची बदली करून या ठिकाणी नवीन कर्तव्यदक्ष ग्रामसेवक यांची नियुक्ती करावी,अशी ग्रामस्थांकडून व विद्यार्थ्यांकडून मागणी होत आहे.