शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
दीपस्तंभ प्रतिष्ठान आयोजित गूणवंत विध्यार्थी यांचा सत्कार सभारंभ सोहळा संपन्न.सेलू : सेलू शहरातील दिपस्तंभ प्रतिष्ठान आयोजीत गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ शालांत प्रमाणपत्र परीक्षा उच्च माध्यमिक NEET,JEE, शिष्यवृत्ती परीक्षा संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा व स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांचा पालकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.गूणवंत विध्यार्थी सत्कार संभारभ आज सकाळी ११ वाजता साई नाट्यगृहात प्रमूख अतिथी व हजारो विध्यार्थी यांच्या उपस्थीतीत सोहळ्यात प्रमूख पाहूणे बोलतांना गणेश शिंदे ( कवी ) यांनी या वेळी पास व नापास झालेल्या विध्यार्थी करीता एक वाक्यात आयूष्य कसे जगावे तर ते आयूष्यात कधी एखाद्या विषयात मार्क कमी पडले म्हणजे आयूष्यात तीच चूक आयूष्य घडवत नसते. ज्यात आपण हूशार आहात तेच करा आपल्याला आयूष्यात यश नक्की मिळेल. तसेच आमदार मेघना दीदी बोर्डीकर यांनी शिक्षण क्षेत्रासोबत नाट्य व कला क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचेही कौतुक केले व जसे शिक्षण क्षेत्रामध्ये यश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या कौतुक करून कलाकारांसाठी सुद्धा एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येईल असेही सांगितले.या वेळी आयोजक आमदार मेघनाताई बोर्डीकर,प्रमुख पाहुणे मा.गणेशजी शिंदे (कवि),प्रा.डॉ.विनायक कोठेकर, डॉ.संजयजी रोडगे साहेब,मनिष बोरगावकर, ताठे सर, मोगल सर,रविद्र डासाळकर, रामेश्र्वर राठी, दत्ताराव कदम, गणेश काटकर, निरज लोया, अशोक अंभोरे, सोळंके सर, किशोर कटारे, बाळू काजळे,विठ्ठल कोकर, आदिनी डॉ.शिवाजी शिंदे यांना पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ वृंदावन मथुरा यांच्यावतीने दुसऱ्यांदा डॉक्टरेट पदवी बहाल केली होती व त्याच विद्यापीठाने त्यांची महाराष्ट्र राज्य संयोजक पदी निवड झाल्या बद्दल मतदार संघाचे नाव लौकिक झाले म्हणून त्यांचा सर्व मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर शहरातील प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक,विध्यार्थी यांचा शाल , श्रीफल, फेडा, स्मृती चिन्ह देवून सत्कार करण्यात आला.


