शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
नूतन महाविद्यालय ते गोविंदबाबा चौक पर्यंत अतिक्रमण हटवण्यात सर्वांना समान हक्क द्यावा न दिल्यास आंदोलनाचा इशारा.सेलू : सेलू शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि भविष्यातील 50 वर्षातील रहदारीसह विकासाच्या अनुसंगाने शासनाने शहराच्या चारीबाजूने डिपी प्लॅन तयार करून त्यानुसार रस्ते 24 मीटर रुंदीचे असून त्यात नाली,फुटपाथ, दुभाजक,विद्धूत पोल आदी बनविण्यासह रस्त्याच्या व शहराच्या सुशोभीकरणासाठी कोटयावधी रुपयांचा निधी मंजूर करून विकासकामाना तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी दिली आहे. मात्र पालिका प्रशासन मनाला वाटेल त्याचे बांधकाम पाडत आहे तर दुसरीकडे कोणाला सुट देत आहे.काही ठिकाणी अतिक्रमण न हटवता रस्ता कमी रुंदीचा करत आहे. शहरातील सर्व रस्ते डिपी प्लॅन नुसार करण्याची मागणी माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी गुरुवारी मुख्याधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे केली. यापूर्वी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते वालूर नाका मार्ग परभणी रोड फिल्टर पर्यंत डिपी प्लॅननुसार रस्त्याची मान्यता दिलेली होती.परंतु शासकीय मान्यतेनुसार तांत्रिक,प्रशासकीय मंजुरीनुसार सदर काम झालेले नाही,याठिकाणी मनमानी करून रस्त्यावरील दुतर्फाचे अतिक्रमणे न हटविता फक्त गोरगरीबांची अतिक्रमणे जबरदस्तीने पाडण्यात आली तोच प्रकार नूतन महाविद्यालय ते गोविंदबाबा चौक (मठ गल्ली) पर्यंत यांच्या नवीन रोड बांधकाम सुरू असताना दिसून येत आहे. नगररचने नुसार 24 मीटर रोड आहे. येथील अतिक्रमण हटवण्यात दिनांक 27 आणि 28 मे 2024 रोजी सुरुवात झाली आहे. मात्र अतिक्रमण हटवण्यात सगळे नियम मोडून मनाला येईल तेथे आपल्या आपल्या हित संबंध सांभाळून वाटेल ते मनमानी करून एक लाईन रेषेत किंवा एक मोजमापाने न पाडता प्रशासक असून देखील राजकीय दबावापोटी स्पष्ट सर्व नागरिका समोर अन्याय करण्यात येत आहे. 24 मीटर वाल्यांचे घर मोजून त्यांच्या पायऱ्या देखील पाडल्या आणि अनाधिकृत बाजूने सरळ सरळ सूट देण्यात आले आहे. हे पूर्णपणे अन्यायकारक आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रस्तावित डिपी रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे हाटवावीत अशी मागणी आता सर्वत्र जोर धरत आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच हे अतिक्रमण सर्वांना समान न्याय देऊन पूर्ण करावे.