शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू : दि.08 सीमा सुरक्षा दल व एनएसजी कमांडो म्हणून कामगिरी बजावणारे सेलूचे भूमिपुत्र संतोष उध्दवराव शेळके यांचे सेवानिवृत्ती निमित्त सेलूवासीयांनी जंगी स्वागत करीत मोठी मिरवणूक काढली.सेलू येथील भूमीपुत्र संतोष शेळके हे गेल्या 21 वर्षांपासून भारतीय सीमा सुरक्षा दलात व एनएसजी कमांडो म्हणून कार्यरत होते. या सेवेत सर्वोत्तम अशी कामगिरी बजावून ते नुकतेच सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्ती नंतर ते सेलूत परतले तेव्हा त्यांचे सेलू रेल्वे स्थानकावर कुटूंबियांसह नातेवाईक, मित्र परिवार व सेलूकरांनी जंगी स्वागत केले. पाठोपाठ मिरवणूकही काढली. ठिकठिकाणी या भूमीपुत्राचे वकील, डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, व्यापारी, सेवानिवृत्त सैनिक, राजकीय पुढारी तसेच सामान्य नागरीकांनी यथोचित स्वागत करीत देशाप्रती सर्वोत्तम सेवा बजावलेल्या शेळके यांना जणू मानवंदनाच दिली. सेलूकरांनी केलेल्या या भव्यदिव्य स्वागताने ठिकठिकाणी केलेल्या सत्काराने भूमीपुत्र असणारे शेळके व त्यांचा परिवार अक्षरशः भाराहून गेला. आपण सेलूवासीयांचे कायम ऋणी राहू अशी प्रतिक्रिया कुटूंबियांनी व्यक्त केली.


