गाव तसा चांगला…..पण दारूत झिंगला
दिपक केसराळीकर ग्रामीण प्रतिनिधी बिलोली
बिलोली तालुक्यातील केसराळी येथे गेल्या अनेक वर्षापासून अवैध धंद्यात वाढ झाली असून, वरचे वर अवैध धंदे करणारे डोके वर काढत आहेत.यांना कुणाची हि वचक राहिली नाही त्यामुळे सर्रास पणे अवैध धंदे सुरू आहेत. बोधन -देगलूर जाणाऱ्या मुख्य रस्त्या लगत असलेल्या जनरल स्टोअर्समध्ये सर्रास पणे रात्रंदिवस विदेशी दारू विक्री केली जात आहे. अवैधरित्या दारू विक्री करणारे एकाच कुटुंबातील तीन तर अन्य दोन व्यक्ती असून ते वेगवेगळ्या ठिकाणी विक्री करतात. कुठे रसायन मिश्रित शिंदी तर कूठे देशी,विदेशी दारू गावात एकूण पाच ठिकाणी विक्री केली जाते. हि विक्री मुख्य रस्त्याला लगत होत आहे. हाच रस्ता गावातून बसस्थानकाकडे जाण्याचा मुख्य रस्ता आहे.त्यामुळे ह्याच रस्त्याने बाहेरगावी जाणाऱ्या महिलांना व शाळेला जाणाऱ्या शाळकरी मुलींना येता जाताना त्रास होत आहे. याकडे मात्र लोकप्रतिनिधी चेही लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. दारुडे दारूच्या नशेत महिलाना पाहून अश्लील भाषा वापरतात. त्यामुळे महिलाना नाहक ञास सहन करावा लागत आहे.अनेक तरुण मोठ्या प्रमाणात व्यसनाकडे वळत आहेत. तर अनेकांचा तरुण वयातच व्यसनामुळे मृत्यूही झाला आहे. व काहींची संसार ही उघड्यावर आले आहेत. यामुळे ही अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी म्हणून अनेक वेळा गावकऱ्यांनी संबंधीत विभागाला निवेदन दिले. गावातील अनेक जेष्ठ नागरिक व तरुणांनी पुढाकार घेऊन पोलीस प्रशासनाला विंनती केली परंतु काही फरक पडत नसल्याचं गावकऱ्यांचे म्हणणे आहे.अवैध धंदे करणारे आणि पोलीस यांचे संबंध कसे असतात हे सर्वश्रुत आहे. संबंधीत प्रशासनाच्या सहकार्याशिवाय अवैध धंदे वाढतच नाहीत.हे जग जाहीर आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनातील अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकर अवैध रित्या होणारी दारु विक्री थांबवावी.अन्यथा लवकरच आंदोलन करण्यात येईल असा इशारा गावकऱ्यांच्या वतीने माध्यमांशी बोलताना दिला आहे.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)