शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
कै.श्रीरामजी भांगडिया चित्रकला स्पर्धा बक्षीस वितरण.सेलू : शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी कर्तृत्ववान व्यक्तींचा आदर्श घेऊन शैक्षणिक प्रगती साधली पाहिजे त्याच बरोबर कला, संगीत क्षेत्रात करियरसाठी खूप संधी उपलब्ध आहेत त्या मुळे बालवयात विद्यार्थ्यांनी या विविध स्पर्धेत सहभाग घेतला पाहिजे असे प्रतिपादन सेलू पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे यांनी केले. शनिवार दि.23 मार्च 2024 रोजी नूतन विद्यालय,सेलू येथील प्रार्थना मैदानावर आयोजीत कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नूतन विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक संतोष पाटील,प्रमुख उपस्थिती राजेश गुप्ता,सदस्य नूतन विद्यालय शिक्षण संस्था, पर्यवेक्षक के.के.देशपांडे,डी.डी.सोन्नेकर चित्रकला विभाग प्रमुख आर.डी.कटारे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.या वेळी चित्रकला स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थी यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.कार्यकर्माचे प्रास्ताविक आर डी कटारे यांनी केले. स्वागत गीत सच्चिदानंद डाखोरे आणि संच यांनी गायीले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.काशिनाथ पल्लेवाड यांनी तर आभार प्रदर्शन फूलसिंग गावित यांनी मानले.चित्रकला स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थी खालील प्रमाणे.गट पाहिला प्रथम :-कु.अनुष्का संतोष बोराडे,नूतन प्राथमिक शाळा,सेलूद्वितीय :कु.मनस्वी मंगेश महाजन,पोद्दार इंग्लिश स्कूल, सेलूतृतीय :कु.नताशा ठोके, बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूल सेलू.गट दुसरा प्रथम :- कु.संस्कृती गजानन आवसकर,नूतन प्राथमिक शाळा,सेलूद्वितीय :-कु.ईश्वरी उत्तम डोंबे,बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूल,सेलू.तृतीय :-कु.श्रीशा आमोल कदम बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूल,सेलू.गट तिसरा प्रथम :- नि.पार्थ विठ्ठल चौधरी,नूतन विद्यालय, सेलू.द्वितीय :- कु.सान्वी गजानन शितळे,नूतन विद्यालय,सेलू.तृतीय :- कु.मनिषा गजानन आवसकर,नूतन कन्या प्रशाला, सेलू.गट चौथा प्रथम :-कु.क्षितिजा कैलास खजिने प्रिन्स अकॅडमी, सेलू. द्वितीय :-कु.हर्षदा बाबासाहेब गलबे,नूतन कन्या प्रशाला,सेलू.तृतीय :कोरडे प्रथमेश सचिन,नूतन विद्यालय,सेलू.