मनोज गवई
तालुका प्रतिनिधी चांदुर रेल्वे
चांदुर रेल्वे :- भारतीय बौद्ध महासभा चांदुर रेल्वे तालुका चे वतीने नुकतेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिन व संविधान दिन तसेच चैत्यभूमीचे शिल्पकार यशवंत उर्फ भैयासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धम्मज्ञान स्पर्धा व तालुक्यातील बौद्ध विहारांमध्ये धम्मग्रंथांचं वाचन करणाऱ्या महिलांचा सत्कार घेण्यात आला असता या कार्यक्रमाचं अवचित्य साधून दिनांक 20 डिसेंबर 2023 ला मूलगंध कुटी विहार येथे भन्ते सारीपुत्त यांच्या हस्ते, दिनांक 10 /3 /2023 ते 19 /३ /२०२३ या दहा दिवसीय धम्म उपासिका शिबिराचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा शाखा चांदुर रेल्वे तर्फे करण्यात आले होते. त्यांच्या मार्गदर्शिका केंद्रीय शिक्षिका नरवाडे ताई या होत्या. भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष सुनील वानखडे तथा सुरेशजी मेश्राम माजी नगरपरिषद उपाध्यक्ष, मूलगंध कुटी विहाराचे सदस्य यांच्या उपस्थित धम्म उपासिका प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले याप्रसंगी मूलबंध कुटी विहार येथील बौद्ध उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या त्या कार्यक्रमाला वामनराव गजभिये,शारदाबाई वानखडे, मनीषा इंगोले, शीला डोळस, ज्योती हुमणे, संघमित्रा कापसेकर ,सुगंधा स्तूल, अनुसया भोजने ,सुकेशनी कावरे, संगीता शेंडे ,कमलाताई मेश्राम, विद्या कांबळे ,विनूताई गावंडे ,ज्योती वावरे, रेखा खोब्रागडे, निर्मला घोडेस्वार अरुणा गोंडाणे ,शोभा सोमकुवर, राजकन्या मेश्राम, प्रगती बोधिले नलिनी वासनिक जिजाबाई मेश्राम, दुर्गा निकोसे ,माया पाटील, चंद्रकला गेडाम ,पद्मा घोडेस्वार,यांनी सहकार्य केले